शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

सरकारी कार्यालयांमध्ये मोफत विधी सेवेचे नामफलक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 11:17 PM

नाशिक : आर्थिक वा अन्य कोणत्याही कारणांमुळे न्यायापासून कोणताही घटक वंचित राहू नये यासाठी विधी सेवा अधिनियम मंजूर करण्यात आला़ यानुसार अनुसूचित जाती-जमाती, महिला, अपंग, ज्येष्ठ नागरिक तसेच दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाºयांना जिल्हा न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत मोफत विधी सेवा दिली जाते़; मात्र ९० टक्के नागरिक याबाबत ...

ठळक मुद्देजनजागृती : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचा उपक्रम; नागरिकांची होणार सोय

नाशिक : आर्थिक वा अन्य कोणत्याही कारणांमुळे न्यायापासून कोणताही घटक वंचित राहू नये यासाठी विधी सेवा अधिनियम मंजूर करण्यात आला़ यानुसार अनुसूचित जाती-जमाती, महिला, अपंग, ज्येष्ठ नागरिक तसेच दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाºयांना जिल्हा न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत मोफत विधी सेवा दिली जाते़; मात्र ९० टक्के नागरिक याबाबत अनभिज्ञ असल्याने आता प्रत्येक सरकारी कार्यालयांमध्ये नामफलक लावले जाणार असल्याचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी सांगितले़जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे देण्यात येणाºया मोफत विधी सेवांबाबत नागरिकांना माहिती व्हावी यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये फलक लावले जाणार आहेत़ शहर पोलीस आयुक्तालयात शुक्रवारी (दि़ १८) शिंदे यांच्या हस्ते नामफलक लावण्यात आला़ यावेळी त्यांनी सांगितले की, अनुसूचित जाती-जमाती, महिला, अपंग, ज्येष्ठ नागरिक तसेच दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाºया नागरिकांना कौटुंबिक वाद वा दिवाणी स्वरूपाच्या दाव्यांसाठी विधी सेवा प्राधिकरणमार्फत कायदेशीर सल्ला व मोफत वकीलही दिला जात असल्याचे सांगितले़जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव व न्या. एस. एम. बुक्के यांनी विधी सेवा प्राधिकरण केंद्रामार्फत शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत सर्व पोलीस ठाणी, जिल्ह्यातील पोलीस ठाणी तसेच शासकीय कार्यालयांमध्येही हे नामफलक लावले जाणार असल्याचे सांगितले़ तसेच केवळ मोफत विधी सेवाच नव्हे सरकारच्या विविध योजनांपासून वंचित असलेल्या नागरिकांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत केली जाणार असल्याचे बुक्के म्हणाले़सरकारी कार्यालयांमध्ये लावण्यात येणाºया या नामफलकावर कायदेशीर सल्ला व मदतीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचा संपर्क क्रमांक, पत्ता तसेच ई-मेल अ‍ॅड्रेसही टाकण्यात आला आहे़ तसेच नागरिकांनी विधी सेवा प्राधिकरण कार्यालयात माहितीसाठी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे़ यावेळी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, उपायुक्त विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे आदींसह पोलीस अधिकारी उपस्थित होते़