ठळक मुद्दे ‘मुलांचे अधिकार’ व ‘ज्युवेनाइल जस्टीस अॅक्ट’ या विषयावर शिबिर
नाशिक : अजाणतेपणी हातून घडलेल्या गुन्ह्यामुळे निरीक्षणगृहात जावे लागलेल्या मुलांना त्यांच्या अधिकाराबाबत माहिती मिळावी यासाठी जिल्हा न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे शनिवारी (दि़१९) उंटवाडी येथील बाल निरीक्षणगृहात ‘मुलांचे अधिकार’ व ‘ज्युवेनाइल जस्टीस अॅक्ट’ या विषयावर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते़जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एस़एम़बुक्के यांनी या शिबिरात मुलांना असणारे अधिकार तसेच ज्युवेनाईल जस्टीस अॅक्टबाबत माहिती दिली़ या शिबिरात निरीक्षणगृहातील ४० ते ५० मुले व त्यांचे पालक सहभागी झाले होते़ अॅड़ ज्योती पठाडे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले़