नाशिक: महाराष्ट्र शासनाच्या कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी गेल्या 25 तारखेला जाहिर झाल्यानंतर दुसरी यादीची प्रतीक्षा असतांना जिल्ह्यातील 1क्2 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमुळे सदर यादी थांबविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून शासनाने निवडणुका असलेल्या जिल्ह्यातील कर्जमुक्तीची यादी स्थगित केली असून यावर मार्ग काढण्यासाठी उच्च पातळीवर विचारविनिमय केला जात आहे.महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी राज्य सरकारने जाहीर केली होती. पहिल्या यादीत नाशिक जिल्ह्यातील सोनांबे आणि चांदोरी या दोन गावांमधील शेतक:यांना या योजनेचा लाभ झाला आहे. या दोन्ही गावांतील 778 पात्र शेतक:यांची यादी पोर्टलवर जाहीर करण्यात आली आणि त्यांचे प्रमाणिकीकरण देखील करण्यात आल्याने त्यांच्या खात्यात कर्जमुक्तीची रक्कम जमा झाली आहे. योजनेतील दुसरी यादी 28 तारखेला जाहिर होणार असल्याचे राज्य शासनाकडून कळविण्यात आले होते. त्यामुळे दुस:या यादीत किती गावे आिण किती शेतक:यांना सामावून घेतले जाते याकडे सर्वाचे लक्ष होते. मात्र जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमुळे दुसरी यादी जाहिर होऊ शकली नाही.
ग्रामपंचायत आचारसंहितेमुळे कर्जमुक्ती यादी रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 7:49 PM