नाशिक : द्वारका परिसरातील जुगार अड्डयावर भद्रकाली पोलिसानी सोमवारी (दि़७) रात्रीच्या सुमारास छापा टाकला़ या छाप्यामध्ये जुगार खेळणाऱ्या सात जुगा-यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून रोख रकमेसह सुमारे सव्वापाच लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
थोरात मळ्याच्या पुर्वेस नदीकिनारी असलेल्या मोकळ्या जागेत पत्त्यांच्या कॅटवर जुगार सुरू असल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंह सूर्यवंशी यांना मिळाली होती़ त्यानुसार सहायक पोलीस उपनिरीक्षक लवांड, पोलीस हवालदार भोज, शिरोळे, परदेशी, बोरसे, खान, चत्तर, ढेरींगे, वाळे, निंबाळकर, धिवर यांनी पावणे सहा वाजेच्या सुमारास छापा टाकला़ या ठिकाणी संशयित मुजफ्फर अयुब शेख (रा़नानावली), किरण कर्पे (रा़समतानगर), अशरफ शेख (रा़भोई गल्ली), निहाल शेख (रा़नाईकवाडीपुरा), मुदसर शेख (रा़बागवानपुरा), हुजेफ चौधरी (रा़बागवानपुरा), प्रकाश भालेराव (राक़ुंभारवाडा) हे पत्त्यांच्या कॅटवर अंदर-बाहर नावाचा जुगार खेळत व खेळवित होते़
पोलिसांनी या संशयितांकडून एक हजार नऊशे रुपये रोख, जुगाराचे साहित्य तसेच जुगाºयांच्या दहा दुचाकी व एक रिक्षा असा ५ लाख १६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ या प्रकरणी पोलीस हवालदार भोज यांनी फिर्याद दिली आहे़