नाशिक : शिक्षण विभागाच्या स्थानिक पातळीवरील समस्या तत्काळ निकाली काढणे किंवा अभिप्राय मागवून प्रकरणावर तोडगा काढण्याचे मार्ग खुले असतानाही कोणतीही चर्चा न करता प्रश्नांची सोडवणूक करण्यास चालढकल केली जात असल्यामुळेच प्रलंबित प्रकरणांच्या फाईल्स वाढतच असल्याचा आरोप शिक्षक तसेच संघटनांकडून करण्यात आला.ओढा येथील मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयात विभागीय शिक्षक दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी चारही जिल्ह्यांचे शिक्षणाधिकारी उपस्थित होते. सातत्याने बदलणाऱ्या निर्णयामुळे अगोदरच गोंधळलेल्या शिक्षण यंत्रणेत अधिकाºयांच्या मनमर्जी कारभारामुळे प्रश्न कायम असल्याचा आरोप करण्यात आला. शिक्षक संघटना अनेक प्रकरणे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून देतात तेव्हा त्यांना त्याची माहिती होते तसेच लागलीच होणाºया कामांसाठीदेखील वेळकाढूपणा केला जातो. शाळा स्तरावरील तपासणी, मार्गदर्शन वर्ग, कार्यशाळा याबाबतीत शिक्षण विभागाकडून पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात आला.बदलेला अभ्यासक्रम, त्यासाठीचे तज्ज्ञ शिक्षक यांचे प्रशिक्षण आणि वार्षिक नियोजनाच्या बैठका नसल्यामुळे यावर्षीचे दिशाहीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याच्या तक्रारीदेखील करण्यात आल्या. याबरोबरच जीपीएफची खाती, त्यांचे क्रमांक, शाळार्थ आयडीतील गोंधळ, आरटीई प्रमाणपत्रांसाठी राहिलेल्या शाळांचे प्रस्ताव, वैयक्तिक मान्यता, डीएड, बीएडला मान्यता मिळणे, अनुकंपा, दफ्तर दिरंगाई, सेवाज्येष्ठता यादी अद्ययावत करणे, वैद्यकीय बिले, वेतनातील दिरंगाई, बॅँकांची अडचण, वेतनश्रेणीचा प्रश्न अशा अनेक विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.बैठकीस आमदार नरेंद्र दराडे, शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, प्राचार्य गजानन खरोटे, शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, एम. व्ही. कदम, महाजन, संजय चव्हाण, सुरेश शेलार, दीपक ह्याळीज, संजय देसले, के. पी. वाघ, राजेंद्र सावंत, के. डी. देवढे, एस. ए. पाटील, अशोक कदम, बाबासाहेब खरोटे, मनोज वाघचौरे, हेमंत पाटील, उदय देवरे, सुनील शिंदे, रामनाथ थेटे, आसिफ शेख आदी शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
शिक्षण विभागाचा गोंधळी कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 10:43 PM
शिक्षण विभागाच्या स्थानिक पातळीवरील समस्या तत्काळ निकाली काढणे किंवा अभिप्राय मागवून प्रकरणावर तोडगा काढण्याचे मार्ग खुले असतानाही कोणतीही चर्चा न करता प्रश्नांची सोडवणूक करण्यास चालढकल केली जात असल्यामुळेच प्रलंबित प्रकरणांच्या फाईल्स वाढतच असल्याचा आरोप शिक्षक तसेच संघटनांकडून करण्यात आला.
ठळक मुद्देशिक्षक दरबार : दिरंगाईमुळे समस्यांमध्ये अधिकच भरशिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित