नाशिक : नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या त्रैवार्षिक निवडणुकीसाठी दोन पॅनल रिंगणात असून, प्रचाराला वेग आला आहे. येत्या १७ रोजी होणाऱ्या निवडणुकीत ६०० मतदार मतदानाचा हक्क बजविणार आहेत. दरम्यान, प्रचाराच्या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपाने वातावरण तापले असून, रात्री उशिरापर्यंत प्रचार केला जात आहे.अध्यक्षपदावर सूर्यकांत रहाळकर हे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. तर उपाध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य आणि कार्यवाह पदासाठी निवडणूक होत आहे. उपाध्यक्ष- २, कार्यकारिणी- ८ आणि कार्यवाह- १ अशा ११ जागांसाठी निवडणूक होत आहे. प्राध्यापक सूर्यकांत रहाळकर यांच्या नेतृत्वाखाली रहाळकर पॅनलने सर्व जागांवर उमेदवार उभे केले असून, प्रतिस्पर्धी एन. एस. हितकारी पॅनलनेही उमेदवार उभे केले आहेत.सूर्यकांत रहाळकर यांच्या नेतृत्वाखाली दिलीप फडके आणि चंद्रशेखर मोंढे उपाध्यक्षपदासाठी रिंगणात असून, कार्यवाह पदासाठी रहाळकर पॅनलचे राजेंद्र निकम यांनी शशांक मदाने यांना आव्हान दिले आहे. तर कार्यकारी मंडळातून पांडुरंग अकोलकर, सरोजिनी तारापूरकर, चंद्रशेखर वाड, भास्कर कोठावदे, विनायक देशपांडे, रतनशेठ भट्टड, श्रीकृष्ण शिरोडे रिंगणात आहेत.हितकारी पॅनलचे सुहास अष्टपुत्रे आणि स्नेहमयी भिडे उपाध्यक्षपदासाठी रिंगणात आहेत. तर कार्यवाह म्हणून शशांक मदाने पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. कार्यकारी मंडळातून वैशाली कुलकर्णी, हेमंत जानवे, वीणा नवले, रेखा क्षीरसागर, स्नेहमयी भिडे, सुहास अष्टपुत्रे हे उमेदवारी करीत आहेत. पेठे विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि माजी कर्मचाºयांनी मिळून एन. एस. हितकारी पॅनलची निर्मिती केली आहे. तर रहाळकर पॅनलने अनुभव तसेच संस्थेच्या कामात सक्रिय असलेले उमेदवारांना रिंगणात उतरविले आहे. दोन्ही पॅनलने प्रचाराला सुरुवात केली असून, रात्री उशिरापर्यंत प्रचार रंगत आहे.
नाशिक एज्युकेशन सोसायटीसाठी दोन पॅनल रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 11:58 PM
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या त्रैवार्षिक निवडणुकीसाठी दोन पॅनल रिंगणात असून, प्रचाराला वेग आला आहे. येत्या १७ रोजी होणाऱ्या निवडणुकीत ६०० मतदार मतदानाचा हक्क बजविणार आहेत.
ठळक मुद्दे११ जागांसाठी निवडणूकआरोप-प्रत्यारोपाने वातावरण तापले