नाशिक : मतदार याद्यांच्या शुद्धीकरण आणि दोषरहित याद्या करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार सुरू असलेल्या विविध प्रकारच्या मोहिमांनंतर आता निवडणूक शाखेची मोबाइल व्हॅन थेट मतदारांपर्यंत पोहोचणार आहे. नावे वगळणे आणि नोंदणी करण्यासाठी अनेकदा आवाहने करूनही राहिलेल्या मतदारांपर्यंत आता निवडणूक शाखाच पोहोचणार आहे. यासाठी ‘नाम मे क्या रखा हैं’ असे घोषवाक्य असलेली व्हॅन मतदारांपर्यंत पोहोचून अर्ज भरून घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.मतदार याद्यांच्या शुद्धीकरण आणि दोषरहित याद्या करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार सुरू असलेल्या विविध प्रकारच्या मोहिमांनंतर आता निवडणूक शाखेची मोबाइल व्हॅन थेट मतदारांपर्यंत पोहोचणार आहे. नावे वगळणे आणि नोंदणी करण्यासाठी अनेकदा आवाहने करूनही राहिलेल्या मतदारांपर्यंत आता निवडणूक शाखाच पोहोचणार आहे. यासाठी ‘नाम मे क्या रखा हैं’ असे घोषवाक्य असलेली व्हॅन मतदारांपर्यंत पोहोचून अर्ज भरून घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. शहर परिसरात मंगळवार (दि.२३) पासून सदर मोहिमेला सुरुवातदेखील झाली आहे.नाशिक सिटीझन फोरम या संस्थेबरोबर झालेल्या बैठकीत मयत आणि दुबार मतदारांची नावे वगळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यावेळी बहुतांश मतदारांना त्यांच्या नावातील बदल अथवा मतदार यादीतील अन्य दुरु स्त्यांसाठी कार्यालयात येण्यासाठी वेळ होत नसल्याने त्या दुरुस्त्या तशाच राहून जातात, असे सर्वसाधारण मत व्यक्त झाले. त्यामुळे मतदारांनी कार्यालयात येण्यापेक्षा मतदारांपर्यंत पोहोचण्याची काही व्यवस्था करता येईल काय यावरदेखील सांगोपांग चर्चा झाली. त्यानुसार प्रशासनाच्या वतीने काही मोबाइल व्हॅन शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये कार्यालयीन वेळेनंतर फिरवल्यास व त्या मोबाइल व्हॅनद्वारे मतदारांकडून अर्ज स्वीकारले गेल्यास मतदारांना मतदार यादीतील दुरु स्तीबाबत अर्ज सादर करणे सोपे होणार आहे.
निवडणूक मोबाइल व्हॅन पोहोचणार मतदारांपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 6:43 PM
नाशिक : मतदार याद्यांच्या शुद्धीकरण आणि दोषरहित याद्या करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार सुरू असलेल्या विविध प्रकारच्या मोहिमांनंतर आता निवडणूक ...
ठळक मुद्दे‘नाम मे क्या रखा हैं’: निवडणूक शाखेची टॅगलाइन; विशेष वाहने सज्ज