शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

५८ टक्क्यांपेक्षा अधिक गळती असलेल्या फीडरवर भारनियमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 5:26 PM

नाशिक : आॅक्टोबर हिटमुळे नागरिक हैराण झालेले असताना ग्राहकांना भारनियमनाचेदेखील संकट ओढवले आहे. उपलब्ध वीज आणि मागणी यांचा ताळमेळ बिघडल्याने सुमारे २००० मेगावॉट विजेचा तुटवडा आहे. बुधवारी यात काही प्रमाणात सुधारणा झाली; मात्र वीज उपलब्धतेची अनियमितता कायम असल्याने भारनियमन अटळ मानले जात आहे.

ठळक मुद्देभारनियमनाचे संकट : वीज उपलब्धतेत काही प्रमाणात सुधारणाऔष्णिक वीजनिर्मिती घटल्यामुळे विजेचा तुटवडा

नाशिक : आॅक्टोबर हिटमुळे नागरिक हैराण झालेले असताना ग्राहकांना भारनियमनाचेदेखील संकट ओढवले आहे. उपलब्ध वीज आणि मागणी यांचा ताळमेळ बिघडल्याने सुमारे २००० मेगावॉट विजेचा तुटवडा आहे. बुधवारी यात काही प्रमाणात सुधारणा झाली; मात्र वीज उपलब्धतेची अनियमितता कायम असल्याने भारनियमन अटळ मानले जात आहे. अगोदरच विजेचा सातत्याने लपंडाव सुरू असताना आता भारनियमनाला ग्राहकांना सामोरे जावे लागणार आहे.राज्यातील विजेच्या उपलब्धतेत काही प्रमाणात सुधारणा झाली असली तरी ५८ टक्क्यांपेक्षा अधिक गळती असलेल्या फीडर्सवरील ग्राहकांना भारनिमयनाचा सामना करावा लागणार आहे. महावितरणची विजेची मागणी सुमारे १९५०० मेगावॉट इतकी असताना औष्णिक वीजनिर्मिती घटल्यामुळे राज्यात विजेचा तुटवडा निर्माण झालेला आहे. दोन दिवसांपूर्वी विजेची तूट ही सुमारे २००० मेगावॉटपर्यंत पोहोचली होती. आता यात काही प्रमाणात सुधारणा झाली असली तरी भारनियमनाचे संकट मात्र कायम आहे.राज्यात कोळशावर होणाऱ्या वीजनिर्मितीमध्ये अनिश्चितता निर्माण झालेली आहे. कोळशाच्या तुटवड्यामुळे औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातून महावितरणला मिळणाºया विजेची उपलब्धता कमी झालेली आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पातून विजेसाठी राखून पाण्याच्या वापरावर मर्यादा असल्याने तेथून जास्तीची वीज निर्माण होण्यास अडचण निर्माण झालेली आहे. विजेचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे महावितरणणे ज्या फिडरवर वीज वितरण हानी आणि वीजबिल वसुलीचे प्रमाण कमी आहे अशा फिडरवर भारनियमन करण्याचा निर्णय घेतला आहे.ज्या फिडरवर ५८ टक्केपेक्षा अधिक वीज वितरण हानी आहे अशा सर्व फिडर्सवर भारनियमन होणार आहे. त्यानुसार जी-१ (५८ ते ६६ टक्के), जी-२ (६६ ते ७४ टक्के), जी-३ गटात ७४ टक्केपेक्षा अधिक वीज वितरण हानी आणि वसुलीचे प्रमाण आहे. त्यामुळे या गटातील ग्राहकांना भारनियमनाचा सामना करावा लागणार आहे. महावितरणच्या या निर्णयाचा फटका काही ग्राहकांना बसणार असला तरी शहरातील ग्राहकांना यामुळे दिलासा मिळाला आहे.--इन्फो--या स्रोतांकडून महावितरणला मिळते वीजकेंद्रीय प्रकल्प, महानिर्मिती, गॅस प्रकल्प, कोयना जलविद्युत प्रकल्प, अदानी पॉवर, रतन इंडिया, जेएसडब्ल्यू, पवन ऊर्जा आणि सौरऊर्जा.

टॅग्स :Nashikनाशिकelectricityवीज