नाशिक: देहविक्रय करणाऱ्या महिला मतदार असल्याने त्यांना ईव्हीएमची माहिती देण्यासाठी महाराष्टÑ राज्य एड््स नियंत्रण संस्था आणि जिल्हा निवडणूक शाखा यांच्या वतीने ‘रेडलाइट’ भागात ईव्हीएम प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. भद्रकाली भागातील परिसरात आयोजित उपक्रमात या महिलांनी सहभाग नोंदवत मतदानप्रक्रियेची माहिती जाणून घेतली.प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या पुढाकाराने या महिलांसाठी शिबिर घेण्यात आले. समाजातील या महिला गुन्हेगार नसून त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी राबविण्यात येणाºया अनेकविध उपक्रमांप्रमाणेच मतदान जनजागृती हा एक उपक्रम आहे. मतदानप्रक्रियेत जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवावा यासाठी निवडणूक शाखेकडून राबविण्यात आलेल्या या मोहिमेतून देहविक्रय करणाºया महिलादेखील सरसावल्या आहेत. मतदानाचा हक्क बजविण्यासाठी मतदान करण्याचा निर्धार यावेळी या महिलांनी केला.सदर जनजागृती मोहिमेला महाराष्टÑ राज्य एड््स नियंत्रण संस्थेचे प्रकल्प संचालक तुकाराम मुंडे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा निवडणूक अधिकारी कुंदन सोनवणे, भद्रकाली पोलीस ठाण्याचे अधिकारी, तसेच एकस नियंत्रण संस्थेचे पथक उपस्थित होते. शिबिरास निवडणूक नायब तहसीलदार सविता पठारे, प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या समन्वयक आसावरी देशपांडे, प्रमुख पाहुणे दीप्ती राऊत उपस्थित होते. यावेळी महिला व दिशा महिला संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.