नाशिक : शेतक-यांनी शेतात रचून ठेवलेल्या तयार शेतमालास काडी लावून पेटवून देत नुकसान करणा-या महिलेस म्हसरूळ शिवारातील शेतकरी मुकुंद पुंडलिक सूर्यवंशी (रा. नक्षत्र ड्रिम, रासबिहारी लिंक रोड, नाशिक) यांनी रंगेहाथ पकडल्याची घटना रविवारी (दि़२८) रात्रीच्या सुमारास रासबिहारी लिंकरोडवरील सूर्यवंशी यांच्या शेतात घडली़ इंदुबाई शंकर मोराडे (रा. तोरणे मळा, म्हसरूळ शिवार, नाशिक) असे शेतमालाचे नुकसान करणा-या संशयित महिलेचे नाव आहे़ म्हसरूळ पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे़मुकुंद सूर्यवंशी यांचे म्हसरूळ शिवारातील रासबिहारी लिंकरोडवर सर्व्हे नंबर १३९, १४० व १४२ येथे शेती आहे. त्यांनी आपल्या शेतात पाळीव जनावरांसाठी भुईमुगाचा पाला व गवत रचून ठेवलेले होते़ रविवारी रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास ते आपल्या पत्नीसह भाजीपाला विक्री करून घरी परतत होते़ त्यांना शेतात आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर ते तत्काळ शेतात पोहोचले असता त्यांना एक महिला पळताना दिसली़ त्यांनी प्रथम आवाज देऊन थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतर पाठलाग करून पकडले असता ती इंदूबाई मोराडे असल्याचे समोर आले़ सूर्यवंशी यांनी तत्काळ या महिलेस म्हसरूळ पोलिसांच्या ताब्यात देत फिर्याद दिली़गत दीड वर्षांपासून म्हसरूळ शिवारातील सुमारे सतरा शेतक-यांचे तयार झालेले गहू, हरभरा, सोयाबीन, भुईमूग, भोपळे, टमाटे ही पिके तसेच जनावरांसाठी शेतात रचून ठेवलेले गवत, जनावरांचे शेड व घरास आग लावून पेटवून दिल्याच्या घटना घडल्या आहेत़ याबाबत शेतक-यांनी वारंवार तक्रारी देऊनही संशयितास पकडण्यात म्हसरूळ पोलिसांना यश आले नव्हते़ विशेष म्हणजे गतवर्षी मुकुंद सूर्यवंशी यांनी शेतात रचून ठेवलेल्या पाच एकर सोयाबीन पिकास आग लावून जाळल्याची घटना घडली होती़ अखेर या संशयितास पकडण्यात शेतक-यांनाच पुढाकार घ्यावा लागला आहे़पोलिसांचे शेतक-यांना अजब सल्लेसूर्यवंशी यांच्या शेतातील पाच एकर सोयाबीन ८ नोव्हेंबर २०१६ रोजी जाळण्यात आली आहे़ त्यावेळी शेतातील कामगाराने एका महिलेला पळताना बघितलेही मात्र तिला पकडण्यात यश आले नव्हते़ या घटनेनंतर म्हसरूळ ग्रामस्थांनी मारुती मंदिरासमोर घेतलेल्या ग्रामसभेत म्हसरूळ पोलीस ठाण्यातील अधिकाºयांना बोलावले असता शेतात सीसीटीव्ही कॅमरे बसवा, वॉचमन ठेवा, हॅलोजन लावा, चोरट्यांना रंगेहाथ पकडून आमच्या ताब्यात द्या, असे अजब सल्ले देण्यात आले होते़
शेतमाल पेटवून नुकसान करणा-या महिलेस रंगेहाथ पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 7:20 PM
नाशिक : शेतक-यांनी शेतात रचून ठेवलेल्या तयार शेतमालास काडी लावून पेटवून देत नुकसान करणा-या महिलेस म्हसरूळ शिवारातील शेतकरी मुकुंद पुंडलिक सूर्यवंशी (रा. नक्षत्र ड्रिम, रासबिहारी लिंक रोड, नाशिक) यांनी रंगेहाथ पकडल्याची घटना रविवारी (दि़२८) रात्रीच्या सुमारास रासबिहारी लिंकरोडवरील सूर्यवंशी यांच्या शेतात घडली़ इंदुबाई शंकर मोराडे (रा. तोरणे मळा, म्हसरूळ शिवार, नाशिक) असे शेतमालाचे नुकसान करणा-या संशयित महिलेचे नाव आहे़ म्हसरूळ पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे़
ठळक मुद्देम्हसरूळ शिवारातील घटना : दीड वर्षात सतरा शेतक-यांचे लाखोंचे नुकसान