नाशिक : अपंग व्यक्तींना स्विकार करण्यात यावा आणि त्यांच्याविषयी समानतेची भावना निर्माण करण्याच्या हेतुने राबविण्यात येणाऱ्या योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्यातील १८ अपंग-अव्यंग जोडप्यांचा जिल्हा परिषदेच्यावतीने सत्कार करण्यात आला.जिल्हा परिषदेचा सामाजिक न्याय विभाग आणि विशेष सहाय्य विभाग यांच्यावतीने अपंगासाठी अनेक योजना राबविल्या जातात. या योजनेंतर्गत अपंग-अव्यंग जोडप्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषदेकडून योजना राबविली जाते. अपंग व्यक्ती बरोबर व्यंग नसलेल्या म्हणजेच सुदृढ व्यक्तीने विवाह केल्यास अशा जोडप्यांना ५० हजाराची आर्थिक मदत केली जाते. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर यांच्या हस्ते जिल्ह्यातील १८ जोडप्यांना धनादेश वाटप करण्यात आले.या योजनेसाठी सन २०१७-२०१८ मध्ये शासनाकडून ९ लाख ५० हजार एव्हढी तरतुद उपलब्ध झाल्याने एकुण १८ जोडप्यांना त्यांचा लाभ देण्यात आला. यावेळी तीन जोडपे उपस्थित होते. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात किरण मार्तंड बर्डे- मनिषा नानाजी सोनवणे, नितीन प्रभाकर क्षत्रीय-सोनाली अरुण कुदाळे, दत्तु विलास दराडे-वैशाली अरुण पालवे या तीन जोडप्यांचा समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांना २५ हजार रुपयांचे टपाल खात्याचे बचतप्रमाणत्र तसेच २४,५०० रोख स्वरुपात देण्यात आले.याप्रसंगी समाजकल्याण समिती सदस्य उपस्थित होते.
अपंग-अव्यंग जोडप्यांना आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 3:00 PM
नाशिक : अपंग व्यक्तींना स्विकार करण्यात यावा आणि त्यांच्याविषयी समानतेची भावना निर्माण करण्याच्या हेतुने राबविण्यात येणाऱ्या योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्यातील १८ अपंग-अव्यंग जोडप्यांचा जिल्हा परिषदेच्यावतीने सत्कार करण्यात आला.
ठळक मुद्देजोडप्यांना ५० हजाराची आर्थिक मदत जिल्ह्यातील १८ अपंग-अव्यंग जोडप्यांचा सत्कार