नाशिक : रस्त्यांवर तसेच गंगाघाटावर राहणाऱ्या वंचित बालकांना आधार कार्ड मिळवून देण्याबरोबरच त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी कार्य करणाºया ‘सेव्ह द चिल्ड्रन’ या संस्थेने जवळपास चार हजार बालकांचे आधार कार्ड काढून त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी हातभार लावला आहे. आधार कार्ड नसलेल्या मुलांना शोधून त्यांना त्यासाठी मदत करण्याबरोबरच त्यांना अन्य सुविधादेखील पुरविण्यात आल्या आहेत.सेव्ह द चिल्ड्रन संस्थेच्या माध्यमातून शहरातील शासकीय व सामाजिक संस्थांचे पुनरावलोकन व समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी याबाबतची माहिती देण्यात आली. महापालिका हद्दीतील झोपडपट्टी तसेच रस्त्यावर राहणाºया बालकांना कायदेशीर ओळख देण्याबरोबरच शासनाच्या अनेक योजनांचा लाभ तसेच शैक्षणिक व व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातून मुलांचे पुनर्वसन करण्यासाठी ‘सेव्ह द चिल्ड्रन’ या संस्थेकडून केले जाते. या कामाचा आढावादेखील बैठकीत घेण्यात आला.बालकांना कायदेशीर ओळख मिळवून देण्याकरिता तसेच शैक्षणिक व व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातून पुनर्वसन करणेकामी, शासनाच्या विविध सामाजिक व आर्थिक योजनांचा व सेवांचा प्रत्यक्षरीत्या लाभ देण्याचे ध्येय आहे. आॅक्टोबर २०१९ अखेरपर्यंत नाशिक शहरात विविध ठिकाणी प्रत्यक्ष आधार केंद्रावर जाऊन व शिबिराच्या माध्यमातून एकूण ४११२ बालकांचे आधार कार्ड काढण्याचे तसेच २८७३ बालकांना विविध सामाजिक व आर्थिक सुरक्षा योजनांशी जोडण्याचे कार्य करण्यात आले आहे.
चार हजार बालकांना लाभले आधार कार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 7:17 PM
नाशिक : रस्त्यांवर तसेच गंगाघाटावर राहणाऱ्या वंचित बालकांना आधार कार्ड मिळवून देण्याबरोबरच त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी कार्य करणाºया ...
ठळक मुद्देसेव्ह द चिल्ड्रन : गंगाघाटावरील वंचित बालकांनाही लाभ