नाशिक : सिडको परिसरात ठिकठिकाणी विजेचे खांब व भूमिगत केलेल्या तारांच्या विद्युत मिनी पिलर तसेच फ्यूज बॉक्स यांची खूपच दयनीय अवस्था झाली असून, काही दुर्घटना होण्याच्या आत या पावसाळ्यात तरी मिनी पिलर्सला झाकण बसवावेत, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सिडको विभाग अध्यक्ष विशाल डोखे यांनी पदाधिकाऱ्यांसह महावितरण व महापालिकेला निवेदन देऊन परिसरातील धोकादायक डीपींचे फोटोच दाखिवले. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पावसाळ्यात लहान मुले खेळत असताना हात लागून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. उघड्या असलेल्या डीपी व खांबांवरील बॉक्स कमी उंचीवर असल्याकारणाने लहान मुलांचा हात त्या ठिकाणी पोहोचू शकतो यामुळे मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे.संबंधित विभागाने उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे. यापूर्वी परिसरात उघड्या विद्युत तारेचे दहा ते बारा बळी गेले आहेत. तरी प्रशासनाने गांभीर्याने उघड्या डीपींची दुरु स्ती करावी यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले.
फ्युज बॉक्स, मिनी पिलर उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 4:17 PM
नाशिक : सिडको परिसरात ठिकठिकाणी विजेचे खांब व भूमिगत केलेल्या तारांच्या विद्युत मिनी पिलर तसेच फ्यूज बॉक्स यांची खूपच ...
ठळक मुद्देधोकादायक : पावसाळ्यात दुर्घटनेची भीती