नाशिक : पाचव्या युथ गटाच्या २३ वर्षांआतील मुलांच्या आणि मुलींच्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत मुलांच्या वैयक्तिक फॉइल प्रकारात महाराष्ट्राचा थोम्बासिंगने महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले.महाराष्ट्र फेंसिंग असोसिएशन, नाशिक जिल्हा फेंसिंग असोसिएशन आणि कै. के.एन.डी. बहुउद्देशीय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पंचवटी येथील संत जनार्धन स्वामी आश्रमच्या हॉलमध्ये या स्पर्धा सुरू आहेत. थोम्बासिंगने आपल्या लौकिकास साजेसा खेळ करत पहिल्या सत्रात ११-७ अशी आघाडी मिळविली. दुसऱ्या सत्रातही त्याने असाच खेळ करत आपली आघाडी आणखी वाढवत ही अंतिम लढत २१-१४ अशी जिंकून महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले.मुलीच्या सँबर या प्रकारात अंतिम सामना छत्तीसगडच्या सौम्या आणि पंजाबच्या हुसनप्रित यांच्यात खेळला गेला. यामध्ये पहिल्या सत्रात दोन्ही खेळाडूंनी जोमाने खेळ केल्यामुळे सौम्याला ८-७ अशी केवळ एका गुणांची आघाडी मिळवता आली. परंतु दुसऱ्या सत्रात छत्तीसगडच्या सौम्याने प्रथमपासूनच आक्र मक खेळ करून सलग ३ गुण मिळविले. त्यानंतरही तिने हीच लय कायम राखत हा अंतिम सामना १८ विरुद्ध १२ अशा फरकाने जिंकून सुवर्णपदक पटकावले. मुलीच्या फाँईल या प्रकारात पंजाबच्या सरंजित कौर आणि केरळच्या एस. जी. आर्चा यांच्यात झालेला अंतिम सामना चांगलाच रंगला.पहिल्या सत्रात केरळच्या आर्चाने ५-३ अशी दोन गुणांची आघाडी मिळविली. दुसऱ्या सत्रात मात्र पंजाबच्या सरंजित कौरने आपला पवित्रा बदलत अचानक हल्ला करण्याचे सूत्र अवलंबून दुसºया सत्रात ९-९ अशी बरोबरी प्रस्थापित केली. त्यानंतर तिसऱ्या आणि निर्णायक सत्रातही सरंजित कौरने आणखी आक्र मक खेळ करत ही आघाडी वाढवत हा सामना १६-१३ असा जिंकून सुवर्णपदक पटकावले.या विविध प्रकारांत विजयी झालेल्या खेळाडूंना प्रमुख पाहुणे शिवसेनेचे महानगरप्रमुख महेश बिडवे यांच्या हस्ते पदके देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत भारतीय तलवारबाजी असोसिएशनचे खजिनदार अशोक दुधारे, महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश काटोळे, या स्पर्धेचे तांत्रिक समितेचे प्रमुख ले. कर्नल विक्र म जामवाल उपस्थित होते.या स्पर्धेतून भारतीय संघाची निवड करण्यात येणार असून, निवड झालेले खेळाडू दि. १३ ते १८आॅक्टोबर दरम्यान मनिला, फिलिपिन्स येथे होणाºया आशियाची स्पर्धेत सहभागी होतील, अशी माहिती अशोक दुधारे यांनी दिली. शनिवारी सकाळी ११ वाजता या स्पर्धांचा समारोप होणार आहे.या स्पर्धाची संपूर्ण तांत्रिक जबाबदारी ले. कर्नल विक्र म जामवाल यांच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या विविध राज्यातून आलेले ३८ पंच पार पडत आहेत.या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नितीन हिंगमिरे, राजू शिंदे, आनंद खरे, दीपक निकम, पांडुरंग गुरव, राजू जाधव आदी प्रतन्यशील आहेत.आजचा निकाल : मुले-वैयिक्तक स्पर्धामुले फाइल -१) एल. थोम्बासिंग (महाराष्ट्र ) - प्रथम, २) अर्जुन (पंजाब)- द्वितीय ३) बिबिष के. (तामिळनाडू ), आणि के. एच. मीताई ( एस.एस.बी.) दोघेही तृतीयईपी - १) पंजाब-प्रथम, २) पंजाब-द्वितीय ३) केरळ आणि एस.एस.सी.बी.तृतीय,मुली-वैयिक्तक स्पर्धाईपी -१)जयसरिता (पंजाब) - प्रथम, २) इना अरोरा (पंजाब)- द्वितीय एम. जे. ग्रिष्मा ( केरळ) आणि विद्यावती ( एस.एस.सी.बी.) दोघीही तृतीयफाँईल -१) सिम्रनजीत कौर (पंजाब)-प्रथम, २) एस. जी. आर्या (पंजाब)- द्वितीय ३) अनिता चानू(मणिपूर ), आणि एम. एचेईल( एस.एस.बी.) दोघीही तृतीय तर सँबर- प्रकारात सौम्या (छत्तीसगड), हुसेनप्रीत कौर(पंजाब) आणि के. अनिता( केरळ), हरप्रित कौर (पंजाब ) यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
महाराष्ट्राच्या थोम्बासिंगने पटकावले सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 8:49 PM
पाचव्या युथ गटाच्या २३ वर्षांआतील मुलांच्या आणि मुलींच्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत मुलांच्या वैयक्तिक फॉइल प्रकारात महाराष्ट्राचा थोम्बासिंगने महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले.
ठळक मुद्देफेन्सिंग : पंजाब, केरळ, मणिपूरची चांगली कामिगरीया स्पर्धेतून भारतीय संघाची निवड करण्यात येणार