नाशिक : राज्यात कुठे ना कुठे आंदोलनाचा उद्रेक होत असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव अधिकाºयांच्या पुणे येथे होणाºया मिटिंग रद्द करण्यात आले असल्याचे समजते. गेल्या आठवड्यात पुण्यात मोठा उद्रेक झाल्यानंतर अनेक अधिकारी पुण्यात अडकले तर काही अधिकाºयांच्या वाहनांचे नुकसान झाल्याने अशाप्रकारची खबरदारी प्रत्येक कार्यालयांना घेण्याच्या सूचना करण्यात आल्याचे बोलले जाते.पुणे येथे अनेक विभागांच्या संचालकांचे कार्यालये आहेत. विभागीय आयुक्तालयांतील शासकीय कार्यालयांचे उपसंचालक कार्यालये उत्तर महाराष्टÑात आहे, तर या कार्यालयांची संचालक कार्यालये पुण्यात आहेत. अनेक विभागांचे मुख्य कार्यालयदेखील पुण्यामध्ये असल्याने पुणे येथे नियमित बैठका होत असतात. विशेषत: शासकीय कर्मचाºयांचे प्रशिक्षण तसेच कार्यशाळा यादेखील बार्टी पुणे येथेच होत असल्यामुळे शासकीय अधिकºयांच्या सातत्याने पुणे येथे दौरे होत असतात.मागील आठवड्यात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अनेक शासकीय अधिकारी पुण्यातच अडकल्याने त्यांची गैरसोय झाली, तर राज्यातील काही जिल्ह्यांतील वर्ग १, वर्ग २ सारखे वरिष्ठ अधिकाºयांना रस्त्यातच थांबविण्यात आल्यामुळे त्यांच्याही सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. अर्थात कुणालाही त्रास अथवा इजा झाली नसली तरी रस्त्यातच त्यांना थांबावे लागले. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून पुणे येथील शासकीय अधिकाºयांचे दौरे स्थगित करण्यात आले असून, बैठकादेखील लांबणीवर टाकण्यात आल्याचे शासकीय वर्तुळात चर्चा आहे.