नाशिक: जागतिक आरोग्य संघटना आणि राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्ह्यात गोवर, रुबेला लसीकरण मोहिम सुरू असून जिल्ह्यातील लसीकरण अंतिम टप्प्यात पोहचले आहे. लसीकरणाची ही आकडेवारी समाधानकारक असली तरी या मोहिमेविषयीची भितीही तेव्हढयाच प्रमाणात आहे. असे असतांनाही जिल्हा आरोग्य विभागाने विविध राबविलेल्या मोहिमेत प्रत्येक तालुक्यात ५० ते ६० टक्कयाच्या पुढे लसीकरण झालेले आहे. आकडेवारीच्या दृष्टीने राज्यात नाशिक जिल्ह्याचा क्रमांक समाधानकारक आहे. परंतु अनेक तालुक्यांमध्ये बालकांपर्यंत पोहचण्यात आरोग्य विभागाला बरीच धावपळ करावी लागली आहे. लसीकरणाची ही ९० टक्के अशी आकडेवारी बुधवार अखेरची असून आठवड्यात यात आणखी भर पडणार आहे. नाशिक जिल्हा गोवर, रुबेलामुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.गोवर, रुबेला लसीकरण मोहीम २०१८-१९ राज्यामध्ये २ कोटी २० लाख मुला-मुलींचे लसीकरण करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या माध्यमातून सदर मोहीम राबविली जात असून बुधवार (दि.२) अखेर १०,२६,९९९ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणाची टक्केवारी ही ९० टक्के इतकी आहे. राज्यस्तरावर या मोहिमेमध्ये नाशिक जिल्ह्याचा क्रमांक पहिल्या पाचमध्ये असल्यामुळे नाशिक जिल्हा गोवर,रुबेला लसीकरणमुक्तीकडे वेगाने वाटचार करीत असल्याचे निदर्शनास येते. नाशिक जिल्ह्यामध्ये एकुण लाभार्थ्यांची संख्या ११लाख ३९ हजार ५४९ इतकी आहे. आत्तापर्यंत १० लाख २६ हजार ९९९ बालकांना लसीकरण करण्यात आले आहे.९ महिने ते १५ वर्ष पर्यंतच्या मुलामुलींना शाळांमध्ये जाऊस लसीकरण केले जात असून प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये देखील लसीकरणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
गोवर, रुबेला लसीकरण अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 5:12 PM
नाशिक : जागतिक आरोग्य संघटना आणि राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्ह्यात गोवर, रुबेला लसीकरण मोहिम सुरू असून जिल्ह्यातील लसीकरण अंतिम ...
ठळक मुद्दे१० लाख २६ हजार ९९९ बालकांना लसीकरण