नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यपदासाठी सहा जणांची नावे निश्चित करण्यात आली असून तशी अधिसूचना विद्यापीठाने जाहीर केली आहे. विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यपदासाठी विद्यापीठ अधिनियमानुसार काही विद्यापीठांकडून नावे सुचविली जातात, तर आरोग्य विद्यापीठही दोन नावांची शिफारस करीत असते त्यानुसार सहा जणांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यपदासाठी डॉ. गजानन एकबोटे, डॉ. मिलिंद देशपांडे, डॉ. विठ्ठल धडके, वैद्य सपन जैन, डॉ. बालाजी डोळे व प्रशांत पवार यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ नुसानर ज्यांचे नियमन केले जाते अशा विद्यापीठातून व्यक्ती नामनिर्देशित करण्यात येतात. त्यानुसार सावित्रीबाई फुले विद्यापीठाकडून डॉ. गजानन एकबोटे, औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यपीठाकडून डॉ. मिलिंद देशपांडे, सोलापूर विद्यापीठाकडून डॉ. विठ्ठल धडके, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून वैद्य सपन जैन यांचे नामनिर्देशन करण्यात आले आहे.विद्यापीठाच्या अधिनियमानुसार अधिसभेसाठी विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू हे दोन व्यक्ती नामनिर्देशित करतात. यापैकी एक व्यक्ती विद्यापीठाचा कर्मचारी, तर दुसरी व्यक्ती विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयाचा किंवा मान्यताप्राप्त संस्थेच्या कर्मचाºयाची अधिसभा सदस्य म्हणून निवड करण्यात येते. त्यानुसार नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. बालाजी डोळे व विद्यापीठातील वरिष्ठ लिपिक प्रशांत पवार यांची अधिसभा सदस्यपदासाठी निवड करण्यात आली.
आरोग्य विद्यापीठ अधिसभा सदस्यासाठी सहा नावे निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 11:04 PM
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यपदासाठी सहा जणांची नावे निश्चित करण्यात आली असून तशी अधिसूचना विद्यापीठाने जाहीर केली आहे.
ठळक मुद्दे डॉ. गजानन एकबोटे, डॉ. मिलिंद देशपांडे, डॉ. विठ्ठल धडके, वैद्य सपन जैन, डॉ. बालाजी डोळे व प्रशांत पवार