नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास विद्यापीठातर्फे प्रारंभ करण्यात आला आहे.याबाबत अधिक माहिती देताना विद्यापीठाचे प्रभारी परीक्षा नियंत्रक डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या मेडिकल, डेंटल, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी व तत्सम आरोग्य विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांचा प्रथम ते अंतिम वर्षापर्यंतच्या या परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखा, एम.एस्सी. अभ्यासक्रमाच्या मेडिकल बायोकेमिस्ट्री, वैद्यकीय विद्याशाखेचे पदव्युत्तर डिप्लोमा, पदव्युत्तर दंत विद्याशाखा, मास्टर आॅफ आॅक्युपेशनल थेरपी, एम.पी.ओ., डिप्लोमा इन आॅप्टोमेट्री, डिप्लोमा इन आॅप्थेमिक सायन्सेस, एम.एस्सी. फार्मास्युटिकल मेडिसिन या अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. विद्यापीठाच्या अन्य अभ्यासक्रमांचे निकाल प्रक्रिया जलद गतीने सुरू असून, त्यांचे निकाल लवकरच टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यात येतील.विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलेला निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ www.muhs.ac.in वर उपलब्ध करून देण्यात आला आहे. निकालाबाबत काही अडचण उद्भवल्यास विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आरोग्य विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेचा निकाल लवकरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 6:59 PM
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास विद्यापीठातर्फे प्रारंभ करण्यात आला आहे.
ठळक मुद्देनिकाल होणार संकेतस्थळावर जाहीरनिकाल होणार संकेतस्थळावर जाहीर