नाशिक : हिरावाडीतील पाणीपुरी कारखान्यातील आग व सिलिंडर स्फोट प्रकरणी पंचवटी पोलिसांनी कारखानामालक अखिलेश केशव चौहान (रा़स्वामी समर्थ केंद्राजवळ, शिवकृपानगर, हिरावाडी, पंचवटी) विरोधात गुन्हा दाखल केला आहे़शिवकृपानगरमधील नंदीनी नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयाला लागून असलेल्या दोन मजली इमारतीच्या छतावर अखिलेश चौहान यांच्या पाणी पुरी बनविण्याच्या कारखान्यास मंगळवारी (दि.२६) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास आग लागली. या कारखान्यातील खाद्यतेलाने पेट घेतल्यानंतर त्याजवळ ठेवलेल्या तीन गॅस सिलिंडरने पेटले व त्यांच्या स्फोटाने संपूर्ण शिवकृपानगर परिसर हादरून गेला़चौहान गत अनेक वषार्पासून या ठिकाणी अनधिकृतपणे पाणीपुरी बनविण्याचा कारखाना चालवित असल्याचे नागरिक सांगतात़ पंचवटी पोलिसांनी कारखानामालक चौहान यांच्या विरोधात इमारतीच्या छतावर पाणीपुरी बनविण्याचा कारखाना (भट्टी) चालवून सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना न करता निष्काळजीपणे असुरक्षितपणे ज्वलनशील गॅस सिलिंडरचा साठा करून तेथील कामगारांनी घरगुती वापराच्या गॅस सिलींडरचा वापर करून कारखान्यात काम करणाºया लोकांसह शेजारी राहणाºया लोकांच्या जिवीतास धोका निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़
हिरावाडीतील ‘त्या’ पाणीपुरी कारखानाचालकाविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 1:13 PM
नाशिक : हिरावाडीतील पाणीपुरी कारखान्यातील आग व सिलिंडर स्फोट प्रकरणी पंचवटी पोलिसांनी कारखानामालक अखिलेश केशव चौहान (रा़स्वामी समर्थ केंद्राजवळ, शिवकृपानगर, हिरावाडी, पंचवटी) विरोधात गुन्हा दाखल केला आहे़
ठळक मुद्देदोन मजली इमारतीच्या छतावर पाणी पुरी बनविण्याच्या कारखाना