शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

पांढुर्लीत पल्स पोलिओ मोहिमेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 6:06 PM

नाशिक : जागतिक आरोग्य संघटनेच्यामाध्यमातून सुरू करण्यात आलेल्या पोलिओ निर्मुलन मोहिमेंतर्गत पांढुर्ली येथे प्रातिनिधीक स्वरुपात जिल्ह्यातील पल्स पोलिओ मोहिमेचे ...

ठळक मुद्देजिल्हा परिषद: शुन्य ते पाच वर्षीय बालकांना डोस

नाशिक: जागतिक आरोग्य संघटनेच्यामाध्यमातून सुरू करण्यात आलेल्या पोलिओ निर्मुलन मोहिमेंतर्गत पांढुर्ली येथे प्रातिनिधीक स्वरुपात जिल्ह्यातील पल्स पोलिओ मोहिमेचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी पांढुर्ली चे सरपंच वैशाली भालेराव, माजी सरपंच शांताराम ढोकणे, उपसरपंच पंढरीनाथ ढोकणे, कैलास वाजे, तुषार मोजाड ग्रामपंचायत सदस्य, सावतानगर सरपंच मंडलिक, घोरवड चे सरपंच रमेश हगवणे तसेच विष्णू वाजे माजी सरपंच ग्रामविकास अधिकारी सातपुते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव व प्राथमिक आरोग्य केंद्र पांढुर्ली येथील डॉ. राहुल पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.अध्यक्षीय भाषणात जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी सांगितले की, आरोग्य विभाग विविध आरोग्य विषयक कार्यक्र म राबवीत असतो. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम महत्वाची मोहीम असून आपल्या घरातील आणि परिसरातील शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ बूथवर नेऊन लस पाजून घेण्यात यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आरोग्य चांगले राखण्यासाठी विविध योजना या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. यासाठी आरोग्य विभाग सतत प्रयत्नशील असतोच याबाबत त्यांनी आरोग्य विभागाचे कौतुक केले. कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही यासाठी नागरिकांनाही त्यांनी आवाहन केले.काही कारणास्तव लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांनाही डोस दिला जाणार आहे. वैद्यकीय अधिकारी पाटील यांनी सर्वांचे आभार मानले कार्यक्र म यशस्वीतेसाठी आरोग्यसेविका पांडागळे , साधना वाजे. हायलिंगे यांनी विशेष प्रयत्न केले.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद