पंचवटी : सियावर रामचंद्र की जय असा जयघोष करीत अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे मंदिर लवकरात लवकर उभे राहावे यासाठी बुधवारी (दि.२८) सकाळी शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत पंचवटीतील काळाराम मंदिरात जलाभिषेक व पूजन करण्यात आले. अयोध्येतून आणलेल्या शरयू नदीच्या पाण्याने काळाराम मंदिरात श्रींच्या मूर्तींना शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, अजय बोरस्ते व खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते जलाभिषेक करण्यात आला.सकाळी राममंदिरात विधिवत पूजन करण्यात येऊन ब्रह्मवृंदाच्या उपस्थितीत मंत्रोच्चारात जलाभिषेक कार्यक्र म झाला. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी हर हिंदू की यही पुकार पाहिले मंदिर फिर सरकार, श्री राम जय राम जय जय राम, सियावर रामचंद्र की जय असा जयघोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या. तर महिलांची संख्याही लक्षणीय होती. सकाळी ८.३० एकत्र आलेल्या कार्यकर्त्यांनी प्रथम मंदिरात प्रदक्षिणा मारून गाभाऱ्यात जलकलशाची विधीवत पुजा करण्यात आली. जलाभिषेक कार्यक्रम प्रसंगी शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख सुनील पाटील, महानगर प्रमुख महेश बडवे, सचिन मराठे, एडव्होकेट श्यामला दीक्षति, सुवर्णा मटाले, नितीन चिडे, प्रमोद नाथेकर, राजू थेटे, सुनील गोडसे, अमोल सूर्यवंशी, दिलीप दातीर, सुनील गोडसे, योगेश बेलदार, राहुल दराडे, दिलीप मोरे, सुधाकर बडगुजर, सुधाकर जाधव, संगीता जाधव, नयना गांगुर्डे,संतोष गायकवाड, सत्यभामा गाडेकर, पूनम मोगरे, ज्योती देवरे, मंगला भास्कर, उमेश चव्हाण, वैशाली राठोड, मंगला दातीर, योगिता अहेर, शोभा दिवे, गोरख वाघ, देवा जाधव, श्याम कंगले प्रवीण तिदमे, संतोष ठाकूर, बाळासाहेब उगले, संजय चिंचोरे, महेश सोपे, प्रमोद नाथेकार, नाना काळे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.