नाशिक : खान्देशबहुल वस्ती असणाºया सिडकोसह शहरात सर्वत्र जळगावी वांग्याला पसंती मिळत आहे. जळगाव, भुसावळ सह आजुबाजुच्या खेड्यातुन येणाºया या लांबट, गोल आकारातील पांढºया, हिरव्या वांग्यांवर ग्राहकांच्या अक्षरशा उड्या पडत आहेत. चवदार, स्वच्छ निघणाºया या वांग्यांचे भरीत हिवाळ्यात खाल्यास आरोग्यदायी मानले जात असल्याने त्याला सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. या वांग्यांचे दर २५ ते ३० रुपये किलो अशा परवडणाºया दरात असल्याने आणि सोबतच मेथी, कांद्याची पात, मटार यांचेही दर कमी असल्याने भरताची भट्टी चांगली जमून येत आहे. हिवाळ्याचे तीन महिने नाशिकच्या बाजारात हे जळगावी वांगी भाव खाऊन जात असल्याचे येथील भाजीविक्रेत्यांनी सांगितले. उर्वरित आठ महिने मात्र नाशिक जिल्ह्यात पिकणाºया वांग्यांना मागणी असते. वांग्याच्या भरीताबरोबरच भाकरी किंवा पोळीच्या जोडीला मेथी, मुळापाला, कांदा पात यापासून तयार केलेला खुडा खाल्ला जातो. सध्या पालेभाज्यांचे दर अत्यंत कमी असल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे. जळगावी वांगी सध्या नाशकात सर्वत्र मुबलक मिळत असले तरी लग्नसराई वा इतर कारणांमुळे जळगावला जाणाºयांकडून, नियमीत अपडाऊन करणाºयांकडूनही या वांग्याची खरेदी केली जात आहे. शेतांवर होणाºया हुरडा पार्ट्यांमध्ये भरताला मागणी आहे. हॉटेल, ढाबे आदि ठिकाणीही भरीत भाकरीच्या डिशची फर्माइश केली जात आहे. बाजारात मटार, गाजर ४० रुपये किलो तर मेथी ५, कांदापात ५ ते १० रुपये प्रतिजुडी दराने मिळत आहे. हिवाळ्यात सध्या निरनिराळ्या भाज्यांची मुबलक प्रमाणात रेलचेल झाली असून गृहिणींचा डब्याचा प्रश्न चुटकीसरशी सुटला आहे तर दररोज वैविर्ध्यपुर्ण पोषक भाजी मिळत असल्याने घरातील सदस्यही आनंद व्यक्त करत आहेत.