नाशिक : कवी दिवंगत किशोर पाठक यांना काव्यरंगातून अनोखी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आजोबा आणि नात यांचे नाते किती वेगळ्या पातळीवरचे असते त्याचा उलगडा करणाऱ्या त्यांच्या ‘नात’ या कवितेच्या सादरीकरणातून रसिकांना भावविभोर केले.
जनस्थान ग्रुपच्या वतीने आयोजित या काव्यमैफलीत वैविध्यपूर्ण विषयांना हात घालत नाशिककर कवींनी त्यांच्या प्रतिभेचे दर्शन घडविले. ‘श्वासापुरते येऊ जवळ, पेलेल तेवढाच सूर धरू, माती सुटेल एवढीच फक्त पंखांमध्ये हवा भरू’ या आनंद जोर्वेकर लिखित कवितेने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. त्यानंतर त्याची प्रचीती एकेका कविगणिक रसिकांना होत गेली. कोरोनाच्या काळामुळे निर्माण झालेली परिस्थिती ही किती भयावह होती त्याचे चित्र उलगडणाऱ्या कवितांचे वाचन यावेळी करण्यात आले. मिलिंद गांधी, प्रकाश होळकर, राजू देसले, पंकज क्षेमकल्याणी, संजय चौधरी, प्रथमेश पाठक, सी. एल. कुलकर्णी, दत्ता पाटील, केशव कासार, कैलास पाटील या कवींच्या कविता व्यासपीठावर ज्यांनी वाचल्या, त्यांनी त्यांच्याही कविता यावेळी प्रस्तुत केल्या.
इन्फो
नृत्यरंगाची अनुभूती
शनिवारी शहरातील दिग्गज कथक, भरतनाट्यम नृत्यांगनांनी सादरीकरण करीत रसिकांना खिळवून ठेवले. त्यात नृत्यांगना सुमुखी अथनी यांनी ‘जानकी नाथ सहाय करे’ ही तुलसीदासांची रचना सादर केली. त्यानंतर ‘बसाे माेरे नैनन मे नंदला’ ही मीराबाईंची ब्रिजेश मिश्रा यांनी गायलेली रचना सादर करून वाहवा मिळविली. यासह ‘भजन बिनाही नाम बिना’ ही संत कबीर यांची रचनाही प्रस्तुत करून रसिकांना खिळवून ठेवले. त्यांना आशिष रानडे, नितीन पवार यांनी साथसंगत केली, तर ज्येष्ठ नृत्यांगना विद्याहरी देशपांडे यांनी बिंदादिन महाराज रचित ‘हे गाैरी रमण’ ही शिववंदना सादर केली. कीर्ती भवाळकर यांनी ‘मी गाईये गणपती जगवंदन’ हे गणेश स्तुतीपर भजन सादर करून लक्ष वेधले. या रचनेतून त्यांनी प्रस्तुत केलेल्या देवीच्या आराधनेलाही दाद मिळत हाेती. आदिती पानसे यांनी ‘वचन प्रण राजा दशरथ’ हा अभंग सादर केला. भरतनाट्यममधून पल्लवी जन्नावार यांनी ‘अच्युतम केशवम’ आणि ‘शिवतांडव’ सादर करीत विशेष लक्ष वेधले. शिल्पा देशमुख यांनी भीमसेन जाेशी यांच्या अभंगावरील नृत्यातून विविध पैलू उलगडले, तर ‘भूमी मंगल’ या गीतातून मंगलतेची कामना करणाऱ्या त्यांच्या नृत्यालाही कमेंट बाॅक्समध्ये दाद मिळाळी. कार्यक्रमाची निर्मिती अभय ओझरकर, विनाेद राठाेड यांची हाेती. विनायक रानडे, लक्ष्मण काेकणे यांचे त्याला सहकार्य लाभले.
फोटो
२६जनस्थान फोटो