संजय पाठक, नाशिक- शहराला दोन प्रमुख धरणांमधून पाणीपुरवठा होत असला तरी अद्याप पावसाळा सुरू झालेला असल्याने नाशिककरांवर चिंतेचे ढग आहेत महापालिकेच्या महासभेत पाण्याचे नियोजन विशेषतः पाणी कपात करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही त्यामुळे चिंता वाढली आहे.
महापालिकेच्या प्रभारी आयुक्त भाग्यश्री बानायत यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेची महासभा आणि स्थायी समितीची बैठक संपन्न झाली या बैठकीत पाणी प्रश्नावर निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र तसे नियोजन झाले नाही. वास्तविक अल निनो मुळे पाण्याचे फेर नियोजन करावे असे शासनाने महापालिकेला कळवले असले तरी गेल्या महिन्यात तसा निर्णय घेण्यात आला नाही त्यातच जून महिना संपत आला तरी अद्याप पावसाळा सुरू झाला नाही त्यामुळे महासभेत या विषयावर चर्चा होणे उपस्थित होते
दरम्यान गंगापूर धरणातून चर खोदून जलविहिरीपर्यंत पाणी आणण्याच्या कामाच्या निविदा मागवण्यासाठी महासभेत प्रस्ताव होता तोही आयुक्तांनी तूर्तास बाजूला ठेवला आहे त्यामुळे पाणीटंचाई जाणवली तर पुढे काय होणार अशी नाशिककरांना चिंता लागून आहे.