शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

थकबाकी असेल तर कायदेशीर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 7:42 PM

ग्रामपंचायत क्षेत्रातील घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली नेहमीच चर्चेचा विषय झाला आहे. होणाºया खर्चाच्या तुलनेत वसुली कमी असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात घट होत आहे. यापुढे थकबाकी करण्यासाठी व्यापक प्रयत्न करणे अपेक्षित असल्याने थकबाकीदारांना कायदेशीर नोटीस बजविण्याची कार्यवाही करावी असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गीते यांनी दिले.

ठळक मुद्दे जिल्ह्यात ७० टक्के वसुली झाली असून ३० टक्के वसुली नाही.थकबाकीदारांना कायदेशीर नोटीस बजविण्याची कार्यवाही

नरेश गीते : गटविकास अधिकाऱ्यांना दिले आदेशनाशिक : ग्रामपंचायत क्षेत्रातील घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली नेहमीच चर्चेचा विषय झाला आहे. होणाºया खर्चाच्या तुलनेत वसुली कमी असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात घट होत आहे. यापुढे थकबाकी करण्यासाठी व्यापक प्रयत्न करणे अपेक्षित असल्याने थकबाकीदारांना कायदेशीर नोटीस बजविण्याची कार्यवाही करावी असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गीते यांनी दिले.जिल्हा परिषदेच्या गटविकास अधिकाºयांबरोबर झालेल्या बैठकीत गीते यांनी मार्च एण्डचा आढावा घेतला असता वसुलीच्या बाबतीत अद्यापही समाधानकारक कारवाई नसल्याचे त्यांनी म्हटले. गेल्या काही वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीबीलात काही प्रमाणात वाढ झाली असली तरी घरपट्टीचा कर मोठ्या प्रमाणात थकीत आहे. त्यामुळे यापुढील काळात वसुली कठोर करावी लागणार आहे. तत्पूर्वी संबंधितांना कारवाईची आणि थकबाकीची माहिती देण्यात यावी असे देखील आदेश गीते यांनी दिले आहेत.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी मुख्य जिल्हा न्यायाधीश शिंदे यांच्यासमवेत आज व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे सर्व गट विकास अधिकाºयांची बैठक घेतली. जिल्ह्यात ७० टक्के वसुली झाली असून ३० टक्के वसुली झालेली नाही. यामध्ये थकबाकीदार मोठ्या प्रमाणात आहेत. या वसुलीसाठी मागील वर्षाप्रमाणेच विशेष मोहिम राबविण्यात येणार असून यासाठी विधी व न्याय विभागाची मदत घ्यावी लागणार आहे. यासाठीच बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य जिल्हा न्यायाधीश शिंदे म्हणाले, तहसीलदारांच्या मदतीने सर्व थकबाकीदारांना तत्काळ नोटीसा बजवण्याचे तसेच याविषयी जनजागृतीसाठी गाव पातळीवर मेळावे, पथनाट्य, रिक्षा मार्फत प्रबोधन करण्याचे आवाहन केले. सदर नोटीस कारवाई करणे अपरिहार्य असल्याचे शिंदे म्हणाले.यावेळी डॉ. नरेश गिते यांनी कुपोषण विषयाचाही आढावा घेत ग्रामविकास आराखड्यात यासाठी तरतूद करण्याचे निर्देश दिले. बैठकीस ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेद्र पाटील, महिला व बालविकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे, सहायक गट विकास अधिकारी देसले, सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी