शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन निर्मितीच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 4:38 PM

केंद्र सरकारच्या सल्लागार समितीमार्फत देखील डेल्टा प्लस या विषाणूच्या अनुषंगाने राज्य शासनास काळजी घेण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट व डेल्टा प्लस या विषाणूंचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी विनाकारण गर्दी करणे टाळावे, त्यासोबतच कोरोना विषाणूपासून बचावासाठी मास्कचा नियमित वापर, सुरक्षित अंतर व वैयक्तिक स्वच्छता या त्रिसूत्रीचा नियमितपणे अंगीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांकडून आढावा : डेल्टा प्लस विषाणूच्या संसर्गाबाबत प्रशासनाला चिंता नागरिकांनी देखील गाफील न राहाता त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना

नाशिक : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येण्याच्या शक्यतेने प्रशासनाकडून दक्षता घेतली जात असतानाच डेल्टा प्लस विषाणूचा फैलाव होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने सतर्क राहण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. नागरिकांनी देखील गाफील न राहाता त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, संभाव्य परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यात लिक्विड मेडिकल ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्याबाबतची कार्यवाही करावी, असेदेखील भुजबळ यांनी सांगितले.पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मुंबई येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील सद्य:स्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय्, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त दुष्यंत भामरे, मालेगाव मनपाचे आयुक्त भालचंद्र गोसावी, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, म्युकरमायकोसिस टास्क फोर्सचे डॉ. संजय गांगुर्डे, आदी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते.यावेळी भुजबळ म्हणाले, केंद्र सरकारच्या सल्लागार समितीमार्फत देखील डेल्टा प्लस या विषाणूच्या अनुषंगाने राज्य शासनास काळजी घेण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट व डेल्टा प्लस या विषाणूंचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी विनाकारण गर्दी करणे टाळावे, त्यासोबतच कोरोना विषाणूपासून बचावासाठी मास्कचा नियमित वापर, सुरक्षित अंतर व वैयक्तिक स्वच्छता या त्रिसूत्रीचा नियमितपणे अंगीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले.गर्दीमुळे डेल्टा प्लसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांनी संचारबंदीचे पालन करण्यासाठी पोलीस यंत्रणेमार्फत कठोर कारवाई करण्यात यावी, डेल्टा प्लस या विषाणूचा फैलाव हा गर्दीच्या ठिकाणी अधिक होत असल्याने पर्यटनस्थळी व इतर ठिकाणीदेखील विनाकारण गर्दी टाळण्याची दक्षता नागरिकांनी घेऊन संपूर्ण जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन देखील पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी केले.पूर्वनियोजनाच्या अनुषंगाने जिल्ह्यात ऑक्सिजन साठ्याबाबत स्वयंपूर्ण असणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यात लिक्विड मेडिकल ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात यावे, त्याचप्रमाणे रुग्णालयात बेड्सची उपलब्धता, ऑपरेशन थिएटर, आवश्यक औषधसाठा या गोष्टींकडे लक्ष देऊन त्यांची तातडीने पूर्तता होण्यासाठी प्रयत्नपूर्वक नियोजन करण्यात यावे, अशाही सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

टॅग्स :NashikनाशिकChagan Bhujbalछगन भुजबळ