नाशिक : दिंडोरी रोडवरील मेरी हायड्रो परिसरात मुक्त संचार करणाºया बिबट्यास वनविभागाने काही महिन्यांपुर्वीच जेरबंद केले होते़ मात्र, गत पंधरवाड्यापासून मखमलाबाद शिवारातील गंगावाडी परिसरात सायंकाळच्या सुमारास पुन्हा बिबट्याचा दर्शन घडत असल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत़मखमलाबाद गंगावाडी हा परिसर शेतमळयाचा परिसर असून या भागात यापुर्वी देखिल नागरीकांच्या शेतात बिबटया आढळून आला होता. त्यातच तिडके मळा परिसरात गत पंधरवाडयापासून सायंकाळी सात ते आठ वाजेच्या सुमाराला बिबट्याचा वावर असून परिसरातील अनेकांना त्याने दर्शन दिले आहे़ यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली असून रात्रीच्या सुमारास घराबाहेर पडण्यास नागरिक घाबरत आहेत़मखमलाबाद शिवारात एकीकडे बिबट्याच्या संचारामुळे नागरिक भयभीत असतांना दुसरीकडे मात्र या भागातील गंगापूर कॅनॉल ते गोदावरी नदीपर्यंतचे पथदीप बंद आहेत. अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या या पथदीपांमुळे परिसरात रात्रीच्या सुमारास अंधाराचे साम्राज्य पसरते़ त्यातच आता पंधरवाडयापासून पुन्हा बिबट्याचा संचार असल्याने नागरिक भयभीत झाले असून या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी केली जाते आहे़
मखमलाबाद गंगावाडीत पुन्हा बिबट्याचा संचार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 5:15 PM
नाशिक : दिंडोरी रोडवरील मेरी हायड्रो परिसरात मुक्त संचार करणाºया बिबट्यास वनविभागाने काही महिन्यांपुर्वीच जेरबंद केले होते़ मात्र, गत पंधरवाड्यापासून मखमलाबाद शिवारातील गंगावाडी परिसरात सायंकाळच्या सुमारास पुन्हा बिबट्याचा दर्शन घडत असल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत़मखमलाबाद गंगावाडी हा परिसर शेतमळयाचा परिसर असून या भागात यापुर्वी देखिल नागरीकांच्या शेतात बिबटया आढळून ...
ठळक मुद्देअनेकांना बिबट्याचे दर्शन ; नागरीक भयभीत