नाशिक : चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा गळा दाबून खून केल्यानंतर गळफास घेतल्याचा बनाव जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन करणा-या न्यायवैद्यक विशेषज्ञांमुळे उघड झाला़ साक्षी उल्हास हांडोरे (३२, रा़हांडोरे मळा, विहितगाव) असे खून करण्यात आलेल्या विवाहितेचे नाव असून या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात पती उल्हास व नातेवाईकांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित उल्हास नरहरी हांडोरे (३८) हे पत्नी साक्षी व कुटुंबियांसह विहितगावजवळील हांडोरे मळ्यात राहतात़ गुरुवारी (दि़४) सकाळच्या सुमारास पत्नी साक्षी हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगत उल्हास हांडोरे यांनी पत्नीचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात आणला़ जिल्हा रुग्णालयातील न्यायवैद्यक विशेषज्ञ डॉ़आनंद पवार व डॉ़ धुम यांना शवविच्छेदन करताना साक्षी हांडोरे या विवाहितेचे आत्महत्या नसून खून करण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले व त्यांनी शवविच्छेदन अहवालातही मृत्युचे कारण नमूद केले व पोलिसांना माहिती दिली़उपनगर पोलिसांनी पती उल्हास हांडोरे यास चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर तो पत्नीने आत्महत्या केल्याचेच सांगत होता़ मात्र शवविच्छेदन अहवालामुळे पतीचा बनाव समोर आला़ या प्रकरणी मयत साक्षी हांडोरे यांचा भाऊ सुनील बळवंत कोठे (४१, नरहरी नगर, जेलरोड) याने उपनगर पोलीस ठाण्यात उल्हास हांडोरे व त्यांच्या नातेवाईकांविरोधात फिर्याद दिली आहे़ या फिर्यादीत पती उल्हास व त्याने नातेवाईकांनी साक्षीचा गळा व तोंड दाबून खून केल्याचे म्हटले आहे़
नाशकात चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 2:21 PM
नाशिक : चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा गळा दाबून खून केल्यानंतर गळफास घेतल्याचा बनाव जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन करणा-या न्यायवैद्यक विशेषज्ञांमुळे उघड झाला़ साक्षी उल्हास हांडोरे (३२, रा़हांडोरे मळा, विहितगाव) असे खून करण्यात आलेल्या विवाहितेचे नाव असून या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात पती उल्हास व नातेवाईकांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़उपनगर पोलिसांनी ...
ठळक मुद्देहांडोरे मळा ; चारित्र्याच्या संशय ; गळा व तोंड दाबून खून पतीसह, नातेवाईकांवर गुन्हा दाखल