नाशिक: महाराष्ट्र शासन कौशल्य विकास व उद्योजकता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुबंई यांच्या वतीने सातपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे आयोजित जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनात मविप्र औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्याथर्यंनी प्रथम क्रमांक मिळविला.या तंत्र प्रदर्शनात जिल्ह्यातील २१ संस्थांनी सहभाग घेतला होता. यामध्ये मविप्र समाज संस्थेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या रोहित काळे, अनिकेत गांगुर्डे, रोहित पवार, आकाश खर्जूल व लखन मांझी यांनी बनविलेल्या आॅटोमॅटिक ट्रॅफिक सिग्नल फॉर इमर्जन्सी वेव्हीकल या प्रकल्पास इंजिनिअरिंग गटात प्रथम क्र मांक पटकावला. यावेळी सह संचालक राजेश मानकर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस, एम, लाडसावंगीकर , एस डी नलावडे यांच्या हस्ते चषक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.या यशाबद्दल मविप्रच्या सरचिटणीस श्रीमती निलिमा पवार,अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सभापती माणकिराव बोरस्ते, उपसभापती राघो आहिरे , चिटणीस डॉ. सुनील ढिकले,संचालक नानासाहेब महाले,सचिन पिंगळे,शिक्षणाधिकारी डॉ.एन एस पाटील यांनी विद्यार्र्थ्यांचा सत्कार केला. याप्रसंगी आयटीआय चे प्राचार्य आर. बी. पाटील ,गटनिदेशक एस्. के . चौधरी,एस. एस. ढोकरे श्रीमती सुर्वे ,.निदेशक सचिन मोरे,.संधान,कडलग, देसले, मळोदे,.जाधव, भुसारे, खालकर यांच्या सह विद्यार्थी उपस्थित होते
इंजिनिअरिंग गटात मविप्र अभियांत्रिकी प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 4:14 PM
नाशिक : महाराष्ट्र शासन कौशल्य विकास व उद्योजकता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुबंई यांच्या वतीने सातपूर येथील ...
ठळक मुद्देतंत्र प्रदर्शन: अॅटोकॅटिक सिग्नल प्रकल्प ठरला उत्कृष्ठ