नाशिक : शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने १६ मे रोजी पाथर्डी फाटा परिसरात तिघा संशयितांकडून २६५ ग्रॅम एमडी ड्रग जप्त केले होते़ या तिघांना ड्रगचा पुरवठा करणारे ड्रगमाफिया नदीम सलीम सौरठिया (वय ३०, रा. नागपाडा, मुंबई) व सफैउल्ला फारुख शेख (वय २३, रा. मीरारोड, मुंबई) या दोघांना मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरातून सापळा रचून अटक केली़ या दोघांकडून ड्रगच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी ८० लाख रुपयांची जॅग्वार कार व ४४ लाख रुपयांचे दोन किलो २०० ग्रॅम एमडी ड्रग्ज असा एक कोटी २४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ या दोघांनाही न्यायालयाने २२ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़
पोलीस निरीक्षक आनंदा वाघ व त्यांच्या पथकाने १६ मे रोजी मध्यरात्री पाथर्डी फाटा परिसरात सापळा रचून टाटा सफारी (एमएच १५ ईक्यू ५००५) वाहनातील संशयित रणजित गोविंदराव मोरे (वय ३२, रा. पाथर्डीफाटा), पंकज भाऊसाहेब दुंडे (३१) आणि नितीन भास्कर माळोदे (३२, दोघे रा. आडगाव शिवार) या तिघांना अटक केली़ या तिघांकडून २६५ ग्रॅम एमडी ड्रग्ज व दहा लाख रुपयांची सफारी कार असा १५ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता़ एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल असलेल्या या तिघांच्या पोलीस कोठडीतील चौकशीत मुंबईतील ड्रगमाफियांची माहिती मिळाली होती़
मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये सापळा रचून गुन्हे शाखेने ड्रगमाफिया नदील सौरठिया व सफैउल्ला शेख या दोघांना २ किलो २०० ग्रॅम एमडी ड्रगसह अटक केली़ तसेच ड्रगतस्करीसाठी वापरत असलेली ८० लाख रुपये किमतीची जॅग्वार कारही जप्त केली आहे़ या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी आतापर्यंत पाच संशयितांना अटक केली असून, त्यांच्याकडून दोन किलो ४६५ ग्रॅम ड्रगही जप्त केले आहे़ ही कारवाई पोलीास आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त विजयकुमार मगर, सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते, पोलीस निरीक्षक आनंदा वाघ व त्यांच्या पथकाने केली़मुंबईतील कारवाईत यांचा सहभाग
विशेष लक्ष्य केंद्रितशहरात ड्रग सापडण्याच्या घटनांमुळे विशेष लक्ष्य केंद्रित करण्यात आले आहे़ पालकांनीही आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवून तो अमली पदार्थाच्या आहारी गेला असल्यास त्याची माहिती बिनदिक्कतपणे पोलिसांना द्या़ बहुतांशी वेळा पालक बदनामीपोटी माहिती देत नाही़ परंतु ही माहिती पोलिसांना मिळाली, तर ड्रगमाफियांच्या मुळापर्यंत पोहोचता येईल व मुलांना या व्यसनातून बाहेर काढण्यास मदत होईल़- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त