नाशिक : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत बंधपत्रीत वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदरचे अधिकारी कामावर जातात कि नाही याचे सनियंत्रण करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी सर्वाना दररोज आॅनलाईन लोकेशन पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत मात्र १७ वैद्यकीय अधिकाºयांनीच प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित असल्याचे लोकेशन पाठविले असून अनेक वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित नसल्याचा अहवाल तालुका वैद्यकीय अधिकाºयांनी दिला आहे. याबाबत तत्काळ चौकशी करून हजर नसलेल्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करून वेतन कपात करण्याच्या सूचना गिते यांनी सर्व तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात आरोग्य सेवा पुरविण्यात येते. यासाठी ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रात बंधपत्रीत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. मात्र अनेक वैद्यकीय अधिकारी हजर राहत नसल्याच्या तक्र ारी असून याबाबत जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतदेखील जिल्हा परिषद सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. याची तत्काळ दखल घेत डॉ गिते यांनी सर्व बंधपत्रीत वैद्यकीय अधिकाऱ्यांना दररोजचे लोकेशन पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र ३३ पैकी १७ जणांनीच सदरचे लोकेशन पाठविले आहेत. तांत्रिक कारण वगळता जे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात गैरहजर होते त्यांची वेतन कपात करण्याचे निर्देश डॉ गिते यांनी दिले आहेत.--इन्फो--काळजी घेण्याचे आवाहनहवामान खात्याच्या सूचनेनुसार राज्यात ११ जुन पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पाशर््वभूमीवर ग्रामपंचायत स्तरावरील सर्व अधिकारी व कर्मचार्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात परिस्थितीवर लक्ष ठेवून व आवश्यक उपायोजना करण्याचे निर्देश सर्व तालुक्यांना देण्यात आले आहेत. वैद्यकीय अधिकारी व ग्रामसेवक यांना कार्यक्षेत्रात उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.