लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गावठी कट्टे विक्रीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगार व त्याचा सहकारी रिक्षाचालकास म्हसरूळ पोलिसांनी तवली फाटा परिसरात सापळा रचून पकडले़ भाजीपाला विक्रेता लखन दिलीप कानकाटे (२९, रा. राजवाडा, सिद्धार्थनगर, मखमलाबाद, नाशिक) व रिक्षाचालक गणेश सुदाम शेलार (२९, रा. निखिल दुकानाशेजारी, यशोदानगर, मेहरधाम, पेठरोड) अशी या दोन्ही संशयितांची नावे असून त्यांच्याकडून चार गावठी कट्टे व दोन जिवंत काडतुसे असा ८० हजार २०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़मखमलाबाद शिवारातील तवलीफाटा येथे दोन संशयित गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची माहिती म्हसरूळ पोलीस ठाण्याचे हवालदार येवाजी महाले यांना मिळाली होती़ त्यानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांना ही माहिती देताच तवली फाटा परिसरात सापळा लावण्यात आला होता़ या ठिकाणच्या रिक्षाथांब्यावर संशयित कानकाटे व शेलार हे आले असता पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता चार गावठी कट्टे व दोन जिवंत काडतुसे असा ८० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला़म्हसरूळ पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले असून त्यांच्यावर भारतीय हत्त्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़ ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर, हवालदार येवाजी महाले, संदीप भांड, प्रशांत वालझाडे, उत्तम पवार, सोमनाथ शार्दूल, निलेश पवार, गणेश रेहेरे यांनी केली. या पथकाचे पोलीस आयुकत डॉ. रवींद्रकुमार सिंगल, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक आयुक्त विजयकुमार चव्हाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांनी अभिनंदन केले आहे़
सराईत गुन्हेगाराकडून चार गावठी कट्टे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 4:06 PM
लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गावठी कट्टे विक्रीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगार व त्याचा सहकारी रिक्षाचालकास म्हसरूळ पोलिसांनी तवली फाटा परिसरात सापळा रचून पकडले़ भाजीपाला विक्रेता लखन दिलीप कानकाटे (२९, रा. राजवाडा, सिद्धार्थनगर, मखमलाबाद, नाशिक) व रिक्षाचालक गणेश सुदाम शेलार (२९, रा. निखिल दुकानाशेजारी, यशोदानगर, मेहरधाम, पेठरोड) अशी या दोन्ही संशयितांची नावे ...
ठळक मुद्दे तवली फाटा परिसरात सापळाचार गावठी कट्टे व दोन जिवंत काडतुसे