शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

अल्पवयीन मुलगी विनयभंग प्रकरणी सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 2:49 PM

नाशिक : अल्पवयीन शाळकरी मुलीची स्कूलव्हॅन रस्त्यात अडवून तिचा विनयभंग करून चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी देणारा आरोपी संजय एैर (३४, रा़ बोरगड, म्हसरूळ) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी मंगळवारी (दि़१०) तीन वर्षे सक्तमजुरी व आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली़ म्हसरूळ - दिंडोरी रस्त्यावरील वडनगरजवळ १४ सप्टेंबर २०१७ रोजी सकाळी घडलेल्या या घटनेनंतर पिडीत मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती़

ठळक मुद्दे जिल्हा व सत्र न्यायालय : स्कूलव्हॅन अडवून अ‍ॅसिडची धमकी म्हसरूळ पोलीस ठाण्यात पोस्कोन्वये गुन्हा दाखल

नाशिक : अल्पवयीन शाळकरी मुलीची स्कूलव्हॅन रस्त्यात अडवून तिचा विनयभंग करून चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी देणारा आरोपी संजय एैर (३४, रा़ बोरगड, म्हसरूळ) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी मंगळवारी (दि़१०) तीन वर्षे सक्तमजुरी व आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली़ म्हसरूळ - दिंडोरी रस्त्यावरील वडनगरजवळ १४ सप्टेंबर २०१७ रोजी सकाळी घडलेल्या या घटनेनंतर पिडीत मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती़

आडगाव शिवारातील सरस्वतीनगरच्या कक़ा़वाघ इंग्लिश स्कूलमध्ये दहावीचे शिक्षण घेणा-या या विद्यार्थिनीस आरोपी संजय एैर हा मोबाईलवरून अश्लिल संदेश पाठवून त्रास देत होता़ यामुळे त्रस्त झालेल्या मुलीने मोबाईल नंबर ब्लॉक केला मात्र मोबाईल क्रमांक बदलून एैरचे त्रास देणे सुरुच होते़ १४ सप्टेंबर २०१७ रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पिडीत मुलगी व्हॅनने इतर मुलांसोबत शाळेत जात होती़ या व्हॅनचा आरोपीने पाठलाग केला व म्हसरूळ दिंडोरीरोडवर व्हॅन अडविली़ यानंतर हातातील बाटलीतील पाणी या मुलीच्या चेहºयावर फेकून आज पाणी फेकले उद्या अ‍ॅसिड फेकेल अशी धमकी देऊन या मुलीचा विनयभंग केला़ या प्रकारास विरोध करणाºया व्हॅनचालकासही आरोपीने दमदाटी केल्याने व्हॅनमधील इतर मुले रडू लागली होती़

पिडीत मुलीने घरी गेल्यानंतर आईला हा सर्व प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार विनयभंग तसेच लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) गुन्हा दा्नखल करण्यात आला होता़ न्यायाधीश शिंदे यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील अ‍ॅड़ शिरीष कडवे यांनी सात साक्षीदार तपासले़ म्हसरूळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक के़बी़जोपळे यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते़ न्यायालयातील पैरवी अधिकारी एस़वाय़ढोले,पी़बी़माळोदे, एस़यू गोसावी यांनी गुन्ह्यातील आरोपीला शिक्षा होण्यासाठी पाठपुरावा केला़

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालयPoliceपोलिस