नाशिक : बेपत्ता व्यक्तीच्या नावावरील शेतजमिनीच्या दस्ताच्या छायांकित प्रती काढून त्यामध्ये बदल करीत बनावट दस्त सूचित स्वत:चे नाव टाकून शेतजमीन नावावर करून फसवणूक केल्याचा प्रकार सातपूरच्या तलाठी कार्यालयात घडला आहे़रामदास शंकर बंदावणे (५५, रा़प्रथमेश अपार्टमेंट, गुलमोहर विहार, सातपूर) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा भाऊ दामोदर शंकर बंदावणे हा परागंदा झालेला आहे़ त्याच्या नावे मौजे सातपूर येथील सर्व्हे नंबर २८२/१ या जमिनीचे दस्तक क्रमांक ७२७५ हे १९९० मध्ये नोंदविलेले आहे़ संशयित प्रेमलता सुभाष खिवंसरा, सुभाष खिवंसरा, भरत खिवंसरा, संजय भिका देवरे, विलास मोहन देवरे, रवींद्र भामरे, सचिन गांगुर्डे, सोनाबाई सिंग, संतोषकुमार सिंग, मुरलीधर पवार व अजय पवार (पत्ता माहिती नाही.) यांनी या दस्ताचे झेरॉक्स प्रतिवर असलेले मिळकतीचे वर्णन सर्व्हे क्रमांक २८२/१ ऐवजी २८२/२ असे बनावट करून ते बनावट दस्तसूची क्रमांक २ असे ३० एप्रिल १९९१ ते १० सप्टेंबर २०१२ या कालावधीत तलाठी कार्यालयात तयार केले व शेतजमीन स्वत:च्या नावावर करून घेत फिर्यादी रामदास बंदावणे यांची फसवणूक केली़याप्रकरणी ११ संशयितांविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
बनावट कागदपत्रांद्वारे बेपत्ता व्यक्तीची जमीन खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 11:09 PM
नाशिक : बेपत्ता व्यक्तीच्या नावावरील शेतजमिनीच्या दस्ताच्या छायांकित प्रती काढून त्यामध्ये बदल करीत बनावट दस्त सूचित स्वत:चे नाव टाकून शेतजमीन नावावर करून फसवणूक केल्याचा प्रकार सातपूरच्या तलाठी कार्यालयात घडला आहे़रामदास शंकर बंदावणे (५५, रा़प्रथमेश अपार्टमेंट, गुलमोहर विहार, सातपूर) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा भाऊ दामोदर शंकर बंदावणे हा परागंदा झालेला ...
ठळक मुद्देशेतजमिनीच्या दस्ताच्या छायांकित प्रती काढून त्यामध्ये बदल ११ संशयितांविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल