नाशिक : नाशिकची मॅरेथॉन गर्ल मोनिका आथरे हिने सलग दुसऱ्यांदा दिल्ली मॅरेथॉन स्पर्धा जिंकून दिल्लीवरील दबदबा कायम ठेवला आहे. रविवारी (दि.२५) सकाळी दिल्लीत झालेल्या फुल मॅरेथॉन स्पर्धेत मोनिका आथरे हिने दोन तास ४३ मिनिटे आणि ४६ सेकंदाची वेळ नोंदवत मॅरेथॉनवरील विजयाची परंपरा कायम ठेवली आहे.नाशिक पोलीस मॅरेथॉन स्पर्धेत अर्ध मॅरेथॉन विजेती ठरलेली मोनिका हिने यावर्षी दिल्लीत पूर्ण मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण करीत विजेतेपद मिळविले. मोनिका मागील वर्षीची दिल्ली मॅरेथॉन विजेती असून, तिने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकाविले आहे. ४२ किलोमीटर पूर्ण मॅरेथॉन पूर्ण करताना तिने दोन तास ४३ मिनिटे आणि ४६ सेकंदांची वेळ नोंदविली, तर नेहमीच मोनिकाला टक्कर देणारी ज्योती गवते ही दुसºया क्रमांकावर राहिली. मोनिका राऊत हिला तिसºया क्रमांकावर समाधान मानावे लागले.यावर्षीची मोनिकाची ही पहिलीच मॅरेथॉन असून, तिने हंगामातील पहिल्या मोठ्या विजयाची नोंद केली आहे. तत्पूर्वी नाशिकमध्ये झालेल्या अर्ध मॅरेथॉनमध्ये तिने विजेतेपद मिळविले होते. १९ फेब्रुवारी रोजी मोनिका आथरे हिने मागीलर्षी सर्वच मॅरेथॉन स्पर्धांमध्ये बाजी मारली होती. मुंबई, ठाणे, वसई विरार, मुंबई, हैैदराबाद, बंगळुरू आणि दिल्ली हाफ मॅरेथॉनची ती विजेती असून, मॅरेथॉन गर्ल म्हणून तिच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. यावर्षी मात्र ती मुंबईतील मॅरेथॉनमध्ये द्वितीय क्रमांकावर होती. पहिला क्रमांक तिचीच मैत्रीण आणि सोबत सराव करणारी संजीवनी जाधव प्रथम आली होती.नाशिकमधील पोलीस मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होऊन मोनिका नुकतीच दिल्लीला स्पर्धेसाठी रवाना झाली होती. एका स्पर्धेनंतर मोठी विश्रांती न घेता तिने दिल्लीतील सर्वात मोठ्या स्पर्धेत सहभाग घेत विजयदेखील मिळविला. मोनिका ही नाशिकच्या भोसला हायस्कूलच्या मैदानावर तसेच क्रीडा संकुलातील सिंथेटिक ट्रॅकवर प्रशिक्षक वीजेंद्रसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तिला महिंद्र अॅन्ड महिंंद्रने प्रायोजित केलेले आहे.
धावपटू मोनिका ठरली दिल्ली मॅरेथॉन विजेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 6:40 PM
नाशिकची मॅरेथॉन गर्ल मोनिका आथरे हिने सलग दुसऱ्यांदा दिल्ली मॅरेथॉन स्पर्धा जिंकून दिल्लीवरील दबदबा कायम ठेवला आहे. रविवारी (दि.२५) सकाळी दिल्लीत झालेल्या फुल मॅरेथॉन स्पर्धेत मोनिका आथरे हिने दोन तास ४३ मिनिटे आणि ४६ सेकंदाची वेळ नोंदवत मॅरेथॉनवरील विजयाची परंपरा कायम ठेवली आहे.
ठळक मुद्देदोन तास ४३ मिनिटे आणि ४६ सेकंदाची वेळ सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकाविले