नाशिक : नाशिक अॅटोमोटिव्ह स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित जे. के. टायर मान्सून स्कूटर रॅली येत्या २५ रोजी नाशिकमध्ये रंगणार आहे. या स्कूटर रॅलीची नाशिककरांना उत्सुकता असून, या स्पर्धेत नामवंत आणि आघाडीचे दुचाकीचालक सहभागी होणार आहेत.गतविजेता व्यंकटेश शेट्टी आणि माजी चॅम्पियन मनजीतसिंग बासन, शमीम खान, मुझफ्फर अली, सय्यद आसिफ अली यांचा समावेश आहे. दोन महिला चालकांनीदेखील आपला सहभाग निश्चित केलेला आहे. मुंबईची निधी शुक्ला व प्रिया गला यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. चालकांसाठी अत्यंत कठीण असलेली ही स्पर्धा धाडस आणि कौशल्याचा आत्मविश्वासपूर्ण खेळ असल्याचे जे. के. मोटर स्पोर्ट्सचे संजय शर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कठीण परिस्थितीत चालकांसमोर मोठे आव्हान असते. चषक व रोख परितोषिकांसोबत जे. के. टायर पहिल्या तीन ओव्हारआॅल विजेत्यांना दोन स्कूटर टायर्स देणार आहेत. या सोबत सर्वोत्तम महिला टाइमर व सर्वोत्तम महिलाचालक यांनाही विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे. या रेसमध्ये आघाडीचे चालक शमीम खान, सय्यद असिफ अली आणि यश पवार यांच्यात चुरस पहायला मिळणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले.स्पर्धात्मक विभागात डर्ट ट्रॅक, पाणी साचलेले भाग यांचा समावेश असेल. हा विभाग १५ कि.मी.चा असणार आहे.सलग पाचव्या वर्षी टीव्हीएस रेसिंग मान्सून स्कूटर रॅलीसोबत नाशिककरांना चुरस पहायला मिळणार आहे. या रॅलीस सकारात्मक निकालाची अपेक्षा असल्याचे टीव्हीएस रेसिंग टीमचे मॅनेजर बी. सेल्वाराजने सांगितले.
नाशकात रंगणार मान्सून स्कूटर रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 10:40 PM
नाशिक : नाशिक अॅटोमोटिव्ह स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित जे. के. टायर मान्सून स्कूटर रॅली येत्या २५ रोजी नाशिकमध्ये रंगणार आहे. या स्कूटर रॅलीची नाशिककरांना उत्सुकता असून, या स्पर्धेत नामवंत आणि आघाडीचे दुचाकीचालक सहभागी होणार आहेत.गतविजेता व्यंकटेश शेट्टी आणि माजी चॅम्पियन मनजीतसिंग बासन, शमीम खान, मुझफ्फर अली, सय्यद आसिफ अली यांचा ...
ठळक मुद्देस्कूटर रॅलीची नाशिककरांना उत्सुकतास्पर्धात्मक विभागात डर्ट ट्रॅक, पाणी साचलेले भाग यांचा समावेश