नाशिक : १५वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा बुधवारी (दि़१३) पासून महाराष्ट्र पोलीस अकादमी येथे होणार आहे़ सहा दिवस सुरू राहणाºया या मेळाव्याचे उद्घाटन सायंकाळी चार वाजता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील रामानंदन यांच्या हस्ते होणार आहे.पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाºयांच्या कौशल्याची चाचणी करण्यासाठी व व्यावसायिक गुणवत्ता सुधारण्यासाठी १९५३ पासून दरवर्षी अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा आयोजित केला जातो़ या कर्तव्य मेळाव्यामध्ये घातपात विरोधी तपासणी स्पर्धा, संगणक स्पर्धा, श्वान स्पर्धा, पोलीस फोटोग्राफी, पोलीस व्हिडीओग्राफी, विज्ञानाची तपासात मदत या सहा प्रकारांमध्ये ही स्पर्धा होणार आहे़ या स्पर्धेमध्ये पदक प्राप्त करणाºया स्पर्धकांची आगामी अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यासाठी निवड केली जाणार आहे़या मेळाव्यात राज्यातील नऊ पोलीस आयुक्तालये, नऊ पोलीस परीक्षेत्र, राज्य राखीव पोलीस बल गट, बिनतारी संदेश विभाग, फोर्स वन मुबई व गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र, महाराष्ट्र गुप्तवार्ता अकादमी, असे एकूण २३ संघांचे सुमारे ४५० स्पर्धक सहभागी होणार आहे़ १३ ते १८ सप्टेंबर या कालावधीत होणाºया या कर्तव्य मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी अकादमीचे संचालक विजय जाधव, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे, गुन्हे अन्वेषण विभागाचे पुण्याचे अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक जय जाधव, अकादमीचे उपसंचालक डॉ. जालिंदर सुपेकर, गुन्हे अन्वेषण पुणे विभागाचे अधीक्षक अक्कानवरू, कल्पना बारवकर आदी उपस्थित राहणार आहेत.
‘एमपीए’मध्ये आजपासून पोलीस कर्तव्य मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 4:06 PM
नाशिक : १५वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा बुधवारी (दि़१३) पासून महाराष्ट्र पोलीस अकादमी येथे होणार आहे़ सहा दिवस सुरू राहणाºया या मेळाव्याचे उद्घाटन सायंकाळी चार वाजता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील रामानंदन यांच्या हस्ते होणार आहे.पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाºयांच्या कौशल्याची चाचणी करण्यासाठी व व्यावसायिक गुणवत्ता ...
ठळक मुद्दे१५वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावाराज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील रामानंदन यांच्या हस्ते उद्घाटन २३ संघांचे सुमारे ४५० स्पर्धक होणार सहभागी