शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

महावितरणने महिनाभरात बदलले ४१ हजार मीटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 10:32 PM

चुकीच्या वीज मीटर रीडिंगची समस्या दूर करण्यासाठी महावितरण कंपनीने नाशिक परिमंडळात महिनाभरात सुमारे ४१ हजारपेक्षा अधिक वीजमीटर बदलले आहेत. ग्राहकांची नवीन वीजजोडणी आणि नादुरुस्त मीटर बदलून देण्यासाठी मीटरचा पुरेसा साठा असल्याचा दावा महावितरणने केला आहे. ग्राहकांना अचूक वीजबिल मिळावे यासाठी सक्षम वीजमीटर बसविण्याची मोहीम महावितरणने सुरू केली आहे.

ठळक मुद्देसक्षम वीजमीटर बसविण्याची मोहीम सुरू मीटरची मागणी व गरज लक्षात घेऊन नवीन मीटरचे वितरण

नाशिक : चुकीच्या वीज मीटर रीडिंगची समस्या दूर करण्यासाठी महावितरण कंपनीने नाशिक परिमंडळात महिनाभरात सुमारे ४१ हजारपेक्षा अधिक वीजमीटर बदलले आहेत. ग्राहकांची नवीन वीजजोडणी आणि नादुरुस्त मीटर बदलून देण्यासाठी मीटरचा पुरेसा साठा असल्याचा दावा महावितरणने केला आहे. ग्राहकांना अचूक वीजबिल मिळावे यासाठी सक्षम वीजमीटर बसविण्याची मोहीम महावितरणने सुरू केली आहे.नादुरु स्त मीटरमुळे ग्राहकांना मनस्ताप, तर महावितरणला नुकसान सहन करावे लागते. मीटर बंद असणे, तुटलेला डिस्प्ले, नादुरु स्त मीटर या कारणांमुळे ग्राहकांचा अचूक वीज वापर नोंदविला जात नाही. परिणामी बिलासंदर्भात वाद निर्माण होऊन महावितरणला आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनाही रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच महावितरणने नियमित आणि अचूक बिलिंगला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक त्या सुधारणा करण्यावर भर दिला आहे. नवीन वीजजोडणी तसेच नादुरु स्त मीटर बदलण्यासाठी महावितरणने पुरेशा प्रमाणात वीजमीटरचा साठा उपलब्ध करून दिला आहे. मीटरची मागणी व गरज लक्षात घेऊन नवीन मीटरचे वितरण होत आहे.नाशिक परिमंडळात गेल्या महिनाभरात ८० हजार सिंगल फेजच्या नवीन मीटरमधून ४१ हजार २५६ जुने मीटर बदलण्यात आले. नाशिक शहर मंडळात २२ हजार ७७५, मालेगाव मंडळात ८५९७, तर अहमदनगर मंडळात ९७८४ मीटर बदलण्यात आले आहेत. बदलेल्या मीटरची विभागनिहाय आकडेवारी - नाशिक शहर मंडळ : नाशिक शहर विभाग १- ९४३९, नाशिक शहर विभाग २- ७१२१, नाशिक ग्रामीण- ३८९३, चांदवड- २४२२, मालेगाव मंडळ : मालेगाव- ३२२६, मनमाड- २३०८, सटाणा- १७२८, कळवण- १३३५, अहमदनगर मंडळ : अहमदनगर शहर- २०२५, अहमदनगर ग्रामीण- ५८२, कर्जत- ५८२, श्रीरामपूर- १७६५, संगमनेर- ५१५६ याप्रमाणे वीजमीटर बदलण्यात आले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकmahavitaranमहावितरण