नाशिक : वीज वितरण कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगत मीटर रिडींगच्या बहाण्याने आलेल्या दोघा संशयितांनी पेठ फाटा परिसरातील एका वृद्धेच्या घरातून सुमारे ५० हजार रुपये किंमतीचे अडीच तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना गुरुवारी (दि.१५) दुपारच्या सुमारास भक्तीधामजवळ घडली़
तुलसी श्याम अपार्टमेंट येथील रहिवासी जयश्री दिलीप जोशी (६०) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार जोशी या पती, मुलगा, सून व नातू यांच्यासह राहतात. मुलगा व सून हे दोघेही कामावर गेलेले असतांना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दरवाजाची बेल वाजल्याने जोशी यांनी दरवाजा उघडला़ दरवाजासमोर उभ्या असलेल्या दोघा संशयितांनी आम्ही वीज वितरण कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगून मीटरचे रिडींग घेण्यासाठी आलो आहेत असे सांगितले़ तसेच दरवाजा उघडण्यास वेळ का लावला असे विचारताच जोशी यांनी गुडघे दुखत असल्याचे सांगितले. यानंतर जोशी यांनी मुलाला फोन लावून दिल्यानंतर यापैकी एका संशयिताने बोलल्यानंतर फोन कट केला.
या दोन संशयितांनी आम्ही गुडघा चोळून देण्याचेही काम करतो असे सांगून दिलीप जोशी यांना वडाची पाने आणण्यास सांगितले़ मात्र त्यांनी नकार देताच जोशी यांना तुळस व उंबराचे पाने आणायला सांगून घरात किती लाईटचे किती पॉईंट आहे ते दाखवा म्हणत दुस-याने अंगावरील दागिन्यांमुळे मंत्राचा उपयोग होत नसल्याने सोने काढून ठेवण्यास सांगितले. त्यानुसार जोशी यांनी दागिने स्वयंपाक खोलीतील एका स्टिलच्या डब्यात ठेवले़ यानंतर संशयितांनी जोशी यांना डोळे मिटून पलंगावर पडून राहा तोपर्यंत आम्ही मीटर रिडींग घेतो असे सांगून दागिने घेऊन पसार झाले़
दरम्यान, बराचवेळ होऊनही दोघेही संशयित न आल्याने जोशी यांनी दागिने ठेवलेला डब्याची तपासणी केली असता दागिण्यांची चोरी झाल्याचे लक्षात आले़ त्यांनी तत्काळ पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेऊन संशयितांविरोधात फिर्याद दिली़एकाच दिवसात दोर घटनाम्हसरूळ परिसरात जनगणना करण्यासाठी तर पेठ फाटा परिसरात विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगत मीटर रिडींग घेण्यासाठी आले असे सांगून दोन संशयितांनी घरात प्रवेश केला़ घरातील वृद्ध माणसे हेरून त्यांना पद्धतशीरपणे विश्वासात घेऊन दोन संशयितांनी चोरी केल्याचे समोर आले आहे़
अनोळखी व्यक्तींना घरात प्रवेश देऊ नयेवीजमीटर रिडींग, जनगणना अशी कारणे दाखवून भामटे घरात घसुन वृद्ध मंडळी हेरत चोरी करीत असल्याचे दिसून येते़ त्यामुळे घरात एकटे राहणा-या वृद्ध नागरिकांनी अनोळखी व्यक्तींना घरात प्रवेश देऊ नये़ तसेच कर्मचाºयाकडे ओळखपत्राची मागणी करावी, तसेच संशय आल्यास तत्काळ पोलीस ठाण्यास माहिती द्यावी़- व्ही़डी़शार्दूल, सहायक पोलीस निरीक्षक, म्हसरूळ पोलीस ठाणे़