लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : कोलकता येथे मेडीकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवर केलेल्या हल्याचा निषेध करत डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय कायदा करण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.नाशिकरोड इंडियन मेडिकल असोशिएशनच्या वतीने विभागीय आयुक्त राजाराम माने यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षात देशात व राज्यात डॉक्टरांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. समाजाची ही बदललेली मानिसकता विचार करायला लावणारी असून यामुळे डॉक्टर व रूग्ण यांच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. डॉक्टरांचे मनोबल खच्चीकरणाऱ्या घटनेबाबत शासन कोणतीच ठाम भूमिका घेत नसल्याचे चित्र आहे. महाराष्टÑासह काही राज्यांनी डॉक्टरांच्या बाबतीत कायदे केले असले तरी त्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाही. डॉक्टरांना संरक्षण मिळण्यासाठी केंद्रीय कायदा करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.निवेदनावर नाशिकरोड इंडियन मेडिकल असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत मुठाळ, सचिव डॉ. अनुप कुमात, डॉ. राजेद्र अकुल, डॉ. रमेश पवार, डॉ. राजेंद्र गायकवाड, डॉ. मयुर सरोदे, डॉ. विनीत वानखेडे, डॉ. प्रशांत पटोळे, डॉ.अभय ढवळे, डॉ. शितल जाधव, डॉ. सतीष पापरीकर, डॉ. राजीव पाठक आदिंच्या सह्या आहेत. प्रशिक्षणार्थी डॉक्टर व झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी चोवीस तास डॉक्टरांनी कामबंद आंदोलन केले. या आंदोलनास मेडिकल ओसशिएशन व डेंटल असोशिएशनने पाठिंबा दिला होता.