नाशिक: ङ्क्तजिल्हा परिषदेतील फाईल्सची कामे पेंडीग राहत असल्याचा अनुभव खुद्द मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देखील आला असून त्यांनी सुचविलेल्या प्रथम प्राधान्यांच्या फाईल्सवर देखील दिरंगाई करण्याची बाब समोर आल्याने संतप्त झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याप्रकरणी सात विभागांमधील कनिष्ठ व सहायक प्रशाासन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.जिल्हा परिषदेतील फाईल पेंडसी आणि दिरंगाईची बाब काही नवी नाही. सर्वसामान्यांपासून सदस्य, पदाधिकारी आणि सभापतींना देखील अनेकदा आलेला आहे. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मीणा यांच्या कार्यकाळात तर पेंडसी प्रकरण चांगलेच गाजले होते. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते यांनी कामाला गती दिल्यानंतर प्रशासनातील कामाकाजात सुधारणा झाल्याचे बोलले जात असतांनाच त्यांच्याच फाईल्स पडून राहात असल्याचे समोर आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या कार्यालयाकडे येणा-या प्रथम प्राधान्याच्या संदर्भांवर सात दिवसाच्या आत कार्यवाही न करणा-या जिल्हा परिषदेच्या ७ विभागातील कनिष्ठ व सहायक प्रशासन अधिका-यांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत.मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे तसेच कार्यालयाकडे विविध प्रकारचे अर्ज तसेच तक्र ारी प्राप्त होत असतात. यामधील महत्वाच्या विषयांचा जलदगतीने निपटारा व्हावा यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाकडून सदरचे अर्ज ‘प्रथम प्राधान्य’ या संदर्भाखाली कार्यवाहीसाठी संबधित विभागाकडे देण्यात येतात. या संदर्भावर संबंधित विभागांनी सात दिवसाच्या आत कार्यवाही करु न त्याचा अहवाल देणे आवश्यक असताना वारंवार पाठपुरावा तसेच लेखी सुचना देवूनही जिल्हा परिषदेच्या सात विभागांनी यासाठी दिरंगाई केली आहे. या कर्मचा-यांमध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संजय कुमावत, आरोग्य विभागातील श्रीमती कल्पना पठाडे, समाजकल्याण विभागाचे उत्तम पवार, ग्रामपंचायत विभागाचे प्रकाश थेटे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील अरुण जाधव, लघु पाटबंधारे विभागातील ज्योती सोनार, महिला व बालविकास विभागातील भानुदास लुटे यांचा समावेश आहे.याची गंभीर दखल घेत डॉ. नरेश गिते यांनी दिरंगाईचा कायदा तसेच महाराष्टÑ जिल्हा परिषद जिलहा सेवा (शिस्त व अपिल) नियमाव्दारे शिस्तभंगाची कारवाई का करु नये याबाबत संबधित कर्मचा-यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे विभाग प्रमुखांच्या अभिप्रायासह खुलासा मागविण्यात आला आहे.
दिरंगाई करणाऱ्या सहाय्यकांना नोटीसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2019 6:45 PM
नाशिक : ङ्क्तजिल्हा परिषदेतील फाईल्सची कामे पेंडीग राहत असल्याचा अनुभव खुद्द मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देखील आला असून त्यांनी सुचविलेल्या ...
ठळक मुद्देजिल्हा परिषद : प्रथम प्राधान्यांच्या फाईल्सही विलंब