शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

निव्वळ चर्चा नव्हे मानसिकता हवी... (विश्लेषण)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 10:34 PM

ऊर्जा राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी मंगळवारी एकलहरे येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्राला भेट दिली आणि अखेरच्या घटका मोजणाऱ्या प्रकल्पाच्या ऊर्जितावस्थेसाठी ...

ऊर्जा राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी मंगळवारी एकलहरे येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्राला भेट दिली आणि अखेरच्या घटका मोजणाऱ्या प्रकल्पाच्या ऊर्जितावस्थेसाठी सकारात्मक भूमिकाही दर्शविली. गत सरकारच्या काळातही तत्कालीन ऊर्जामंत्र्यांनी यापेक्षा वेगळी भूमिका मांडली नव्हती. परंतु त्यानंतर त्यांनी सातत्याने सदर प्रकल्प अव्यवहार्य असल्याची नकारात्मक बाब कायम पुढे केली. या प्रकल्पाचे विस्तारीकरण करणे म्हणजे निधीचा अपव्यय असल्याचे चित्र निर्माण केले. तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे सदर प्रश्न अनेकदा गेला, परंतु त्यांनी कधीही या प्रकल्पाच्या बाजूने ठाम भूमिका मांडली नाही. त्यामुळे प्रकल्प सुरू ठेवण्याबाबत राज्यकर्त्यांची मानसिकता नसल्याची चर्चा ते थोपवू शकले नाही. अशी वेळ आताच्या महाविकास आघाडीवर येऊ नये, अशी अपेक्षा कामगार आणि गावकऱ्यांचीही नक्कीच असणार.एकलहरे येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्र बंद करून नागपूरमध्ये सदर प्रकल्प कार्यान्वित करण्याचे धोरण घेतलेल्या फडणवीस सरकारने गेल्या पाच वर्षांत नकारात्मक विधाने करून या प्रकल्पाविषयी नेहमीच अनिश्चितता कायम ठेवली. तत्कालीन ऊर्जामंत्र्यांची प्रस्तावित ६६० मेगावॉट प्रकल्पाविषयी नकारात्मक भूमिका लपून राहिली नव्हती शिवाय एकलहरेची वीजनिर्मिती राज्य शासनाला परवडत नसल्याचे सांगून प्रकल्प अव्यहार्य ठरविण्याचे गत सरकारचे मनसुबेही उघड झाले. पक्षाची भूमिकाच म्हटल्यावर स्थानिक आमदारांनी त्याकाळी याबाबत कोणताही पाठपुरावा केला नाही. तोही रोष नागरिकांमध्ये आहेच. परिणामी नागरिकांना एकत्र येत एकलहरे प्रकल्प बचावासाठी कृती समिती स्थापन करावी लागली. गेल्या चार वर्षांत नागरिकांचा एकाकी लढा सुरू असतानाच ऊर्जा राज्यमंत्री तटकरे यांनी दिलेल्या भेटीमुळे प्रकल्पाला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा आहे.१९७० मध्ये एकलहरे येथे नाशिक थर्मल पार्वर अर्थात औष्णिक वीजनिर्मिती केंद्र उभे राहिले आणि राज्यातील आपली उपयुक्तता या केंद्राने सिद्ध केली. आजवर वीजनिर्मितीचे शिखर चार वेळा सर केलेल्या या प्रकल्पाने महाराष्टÑाचाही लौकिक वाढविला मात्र सध्या हा प्रकल्प अखेरची घटका मोजत आहे. एकलहरे येथे सध्या दोनच संच कार्यान्वित असून, हे संच कधीही बंद होऊ शकतील, अशी या प्रकल्पाची अवस्था आहे. ऊर्जा राज्यमंत्र्यांच्या दौºयाने एक आश्वासक ऊर्जा नाशिककरांमध्ये निर्माण झाली असली तरी याबाबत राज्य शासनाची मानसिकता काय असेल यावर त्यांच्या दौºयाचे यशापयश अवलंबून राहणार आहे.दुर्लक्ष की दिशाभूल....भाजप सरकारच्या काळात लोकप्रतिनिधी, नागरिक आणि आणि कामगारांचे सर्व प्रकारचे प्रयत्न करून झाल्यानंतरही एकलहरे औष्णिक केंद्राला ऊर्जा देण्याची भाजपची मानसिकता नसल्याचे बोलले गेले. आता महाआघाडी सरकारच्या ऊर्जा राज्यमंत्र्यांनी भेट दिल्याने पुन्हा अपेक्षा पल्लवित झाल्या असणार. परंतु प्रकल्प पुन्हा सुरू होणे शक्य आहे का? याविषयीची एक बाब नुकतीच घडून गेलेली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात औष्णिक केंद्रे खर्चिक असल्याने असे केंद्र बंद करून सोलर प्रकल्पाला प्राधान्य देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे ही बाब दुर्लक्षित केली जात आहे की दिशाभूल हे आता काळच ठरवेल.

टॅग्स :Nashikनाशिकelectricityवीज