शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

दलित चळवळीचे ज्येष्ठ नेते ओहोळ यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 6:28 PM

नाशिक : दलित चळवळीचे ज्येष्ठ नेते आणि रा. सु. गवई यांचे विश्वासू सहकारी दलितमित्र डॉ. एस. जी. ओहोळ (८६) ...

नाशिक : दलित चळवळीचे ज्येष्ठ नेते आणि रा. सु. गवई यांचे विश्वासू सहकारी दलितमित्र डॉ. एस. जी. ओहोळ (८६) यांचे बुधवारी (दि.२८) सकाळी ७.३० वाजता अकस्मात निधन झाले. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली, सूना, नातवंडे असा परिवार आहे. सायंकाळी दसक येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.    उपनगर येथे सध्या त्यांचे वास्तव्य होते.  पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील फाळणे हे त्यांचे मूळ गाव. नोकरीनिमित्त ते ठाण्याला आले आणि तेथूनच चळवळीशी ते जोडले गेले. मुंबईत त्यांनी स्मॉल स्केल इंडस्ट्रीयल अ‍ॅन्ड जनरल वर्कस फेडरेशनची स्थापना केली. या फेडरेशनचे अधिवेशन त्यांनी यशस्वी करून दाखविल्यानंतर ते अधिक चर्चेत आले. १९६५ मध्ये कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या भूमिहीन सत्याग्रह आंदोलनातील २०२ सत्याग्रहींचे त्यांनी यशस्वी नेतृत्व केले. या आंदोलनात त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. नामांतर चळवळतही त्यांचा लक्षणीय सहभाग होता.रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे अध्यक्ष रा. सू. गवई यांच्याबरोबर ते १९८५ मध्ये संपर्कात आले. गवई यांच्याबरोबर त्यांनी अनेक सामाजिक आणि राजकीय आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. रिपाइं गवई गटाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य तसेच उत्तर महाराष्टÑ अध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली. अखेरच्या श्वासापर्यंत ते गवई गटातच राहिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची साहित्य संपदा आणि बौद्ध धर्माचा प्रचार, प्रसार यासाठी त्यांनी देशभरात अनेक प्रदर्शने भरविली. दलितांच्या अनेक प्रश्नांवर त्यांनी आवाज उठविला. अनेक शासकीय आणि अशासकीय समित्यांवर त्यांनी काम केले. १९९५ मध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाने दलितमित्र पुरस्कार देऊन गौरविले. 

 

टॅग्स :Nashikनाशिकsocial workerसमाजसेवक