लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : निफाड येथील कांदा व्यापाºयाचे लक्ष विचलित करून त्याच्या कारमधील साडेसहा लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लुटून नेल्याची घटना मंगळवारी (दि़८) सायंकाळी शरणपूर रोडवरील कुलकर्णी गार्डन परिसरात घडली़सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निफाड येथील कांदा व्यापारी अजय सुभाषचंद्र सोनी (रा. निफाड) यांनी सायंकाळी राजीव गांधी भवनसमोरील आयसीआयसीआय या बँकेतून ६ लाख ३५ हजारांची रक्कम काढली़ शहरातील कामे आटोपल्यानंतर निफाडला जाण्यापूर्वी त्यांनी कुलकर्णी गार्डनजवळील एका वाइन शॉपजवळ कार थांबविली़ त्यांनी पैशांची बॅग बाजूच्या सीटवरच ठेवली होती़ त्यांना दोन संशयितांनी पैसे खाली पडल्याचे सांगितल्याने ते कारच्या खाली उतरले असता संशयितांनी पैशांची बॅग लंपास केली़या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे हे घटनास्थळी दाखल झाले होते़ पोलिसांनी वाइन शॉप व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा शोध घेतला तसेच नाकाबंदीही केली, मात्र संशयितांचा शोध लागला नाही़ दरम्यान, या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
कांदा व्यापाºयाची साडेसहा लाख रुपयांची रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2017 11:53 PM
लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : निफाड येथील कांदा व्यापाºयाचे लक्ष विचलित करून त्याच्या कारमधील साडेसहा लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लुटून नेल्याची घटना मंगळवारी (दि़८) सायंकाळी शरणपूर रोडवरील कुलकर्णी गार्डन परिसरात घडली़सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निफाड येथील कांदा व्यापारी अजय सुभाषचंद्र सोनी (रा. निफाड) यांनी सायंकाळी राजीव गांधी भवनसमोरील आयसीआयसीआय या बँकेतून ...
ठळक मुद्दे निफाड येथील कांदा व्यापारीपैसे खाली पडल्याचे सांगितल्याने कारच्या खाली उतरले सीसीटीव्ही फुटेजचा शोध