नाशिक : सराईत गुन्हेगार तथा अखिल भारतीय सेनेचा शहराध्यक्ष निखिल मोरे उर्फ बाल्याच्या खुनातील अटक केलेले संशयित शरद दीपक पगारे, आरिफ शेहेजान कुरेशी, सागर आनंदा चंद्रमोरे व रोशन जयवंत पगारे चौघा संशयितांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने २८ आॅगस्टपर्यंत वाढ केली आहे़ दोन वर्षांपूवीच्या एका खुनाच्या कारणावरून मोरेचा खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे़ दरम्यान, यातील तीन संशयित अद्यापही फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे़दिंडोरीरोडवरील कलानगर परिसरात गुरुवारी (दि़१७) रात्री निखिल मोरेहा मित्र सुरज खोडे व अमोल निकम यांच्यासमवेत चौकात बसलेले होते़ यावेळी दुचाकीवर आलेल्या संशयितांनी मोरेवर पिस्तुलातून गोळ्या तसेच धारदार शस्त्राने वार केले़ यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मोरेचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला़ याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़म्हसरूळ पोलिसांनी संशयितांच्या कोठडीत केलेल्या चौकशीत दोन वर्षांपूर्वी भगवान सानप या युवकाचा खून करण्यात आला होता़ त्याचा खून हा टोळीयुद्धातून झाल्याचे समोर आले होते़ तसेच या खुनामुळे निर्माण झालेल्या वैमनस्यातून ठक्कर बाजार परिसरात गुणाजी जाधव याचा खून करण्यात आला़ या दोन्ही खुनामध्ये सराईत गुन्हेगार निखिल मोरे संशयित होता़ या दोन खुनाचा काटा काढण्यासाठीच मोरेच्या प्रतिस्पर्धी गटाने हा खून केल्याचे तपासात समोर आले आहे़
मोरेच्या खुनातील संशयितांच्या कोठडीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 11:36 PM
नाशिक : सराईत गुन्हेगार तथा अखिल भारतीय सेनेचा शहराध्यक्ष निखिल मोरे उर्फ बाल्याच्या खुनातील अटक केलेले संशयित शरद दीपक पगारे, आरिफ शेहेजान कुरेशी, सागर आनंदा चंद्रमोरे व रोशन जयवंत पगारे चौघा संशयितांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने २८ आॅगस्टपर्यंत वाढ केली आहे़ दोन वर्षांपूवीच्या एका खुनाच्या कारणावरून मोरेचा खून करण्यात आल्याचे पोलीस ...
ठळक मुद्देपोलीस कोठडीत २८ आॅगस्टपर्यंत वाढतीन संशयित अद्यापही फरारखुनाचा काटा काढण्यासाठीच प्रतिस्पर्धी गटाने केला खून