नाशिक : शहरातील जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले असून, मंगळवारी (दि़२७) पंचवटी व नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीत टाकण्यात आलेल्या छाप्यात नऊ जुगा-यांना ताब्यात घेण्यात आले आहे़ या जुगा-यांकडून २२ हजार रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़
पंचवटी पेठ नाक्यावरील बीझेड प्लाझा बिल्डिंगच्या तळमजल्यात जुगार सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस शिपाई राहुल पालखेडे यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ अधिकाºयांनी मंगळवारी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास गाळा नंबर एकमध्ये छापा टाकला. या ठिकाणी संशयित दिनेश रामदास जाधव (वय २७, रा. लक्ष्मणनगर, पेठरोड, पंचवटी), विकास दीपक गायकवाड (वय २६, रा. लक्ष्मणनगर, पेठरोड, पंचवटी), खंडू चिंतामण सुरंजे (वय ४०, रा. पेठरोड, पंचवटी), दीपक रमेश जाधव (वय ३६, रा. लक्ष्मणनगर, पेठरोड, पंचवटी, नाशिक), पप्पू बाबूराव बोंबले ऊर्फ गांगुर्डे (रा. दत्तनगर, मायको दवाखान्यामागे, पंचवटी, नाशिक), दशरथ साहेबराव धोत्रे (वय ३४, रा. नवनाथनगर, पेठरोड, पंचवटी) व दत्तात्रय किसन फोेकणे (वय ५०, रा. मायको दवाखान्यासमोर, पंचवटी, नाशिक) हे मेन नाईट जनता, तसेच वरळी महाराष्ट्र नावाचा जुगार खेळत होते़
या जुगा-यांकडून २२ हजार २० रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून, त्यांच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
दुसरा छापा नाशिकरोड पोलिसांनी शिवाजी पुतळ्यासमोरील भाजी मार्केट परिसरात मंगळवारी दुपारच्या सुमारास टाकला़ संशयित विशाल पुंडलिक केदारे (वय २९, रा. तक्षशिला शाळेजवळ, मालधक्कारोड, देवळालीगाव, नाशिकरोड) व सुनील दिलीप गालफाडे (वय ३०, रा. स्टेशनवाडी, देवळाली कॅम्प, नाशिकरोड) हे कल्याण नावाचा मटका जुगार खेळत होते़ या दोघा संशयितांकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़