नाशिक : राष्टÑीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झालेल्या असताना केवळ नाशिक जिल्हाच मागे असल्यामुळे अपुºया कर्मचारी संख्येमुळे जिल्ह्यातील जवळपास ७० टक्के आरोग्य उपकेंद्रे कुलूपबंद असल्याचा दावा जिल्हा परिषद सदस्यांनी केला आहे. वैद्यकीय अधिकारी नियुक्तीप्रकरणी दिरंगाई होत असल्यामुळे जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली असल्याचा आरोप जिल्हा परिषदेच्या स्थायी सभेत करण्यात आला.जिल्ह्यात प्रभावीपणे आरोग्य यंत्रणा राबविण्यासाठी राष्टÑीय आरोग्य अभियानांतर्गत वैद्यकीय अधिकारी भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली होती. परंतु या प्रक्रियेस विलंब झाल्याने जिल्हा, तालुका, गावपातळीवरील आरोग्य यंत्रणा विस्कळीत झाल्याचा आरोप सभापती यतिंद्र पगार यांनी केला. जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी राष्टÑीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती होणे अपेक्षित आहे. परंतु जिल्ह्यातील भरतीप्रक्रियेत कोणतीही प्रगती नसल्यामुळे काही वैद्यकीय अधिकाºयांची नियुक्ती होऊनही त्यांना रुजू करून घेण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आला.आत्माराम कुंभार्डे यांनीदेखील आरोग्य विभागाच्या कारभारावर टीका करीत आपल्या गटातील नवीन वैद्यकीय उपकेंद्र यंत्रणेसह सुसज्ज असताना केवळ अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती नसल्यामुळे या इमारतीची दुरवस्था झालेली आहे. इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फोडण्यात आलेल्या आहेत. इतर गटांमध्येदेखील अशाच प्रकारच्या इमारती पडून आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर असताना केवळ कर्मचारी संख्येअभावी उपकेंद्रांना टाळे लागणार असेल तर तत्काळ भरतीप्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी कुंभार्डे यांनी केली. वैद्यकीय अधिकाºयांची पदे ११ महिन्यांच्या कंत्राटी पद्धतीने भरली जाणार असतानाही शासनाकडे प्रकरणे मंजुरीसाठी पाठवून विलंब केला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. शासनाच्या नियमाप्रमाणे बिंदूनामावलीनुसारच भरती करावी लागणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. देकाटे यांनी सांगितले.
७० टक्के आरोग्य उपकेंद्रे बंद असल्याचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 6:07 PM
नाशिक : राष्टÑीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झालेल्या असताना केवळ नाशिक जिल्हाच मागे असल्यामुळे अपुºया ...
ठळक मुद्देअपुरी कर्मचारी संख्या : भरती नसल्याने ओढावली परिस्थिती