नाशिक : शेतातील विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या मुलाला विजेचा धक्का लागल्याचे पाहून त्यास वाचविण्यासाठी गेलेल्या आईसह मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पेठ तालुक्यातील कुलवंडी येथे शनिवारी (दि़१९) रात्रीच्या सुमारास घडली़ हिरामण झिपर सहारे (४७) व शांताबाई झिपर सहारे (७०) अशी विजेच्या धक्क्याने मृत्यूमुखी पडलेल्या मायलेकाची नावे आहेत़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिरामण सहाणे हे सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शेतातील विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेले होते़ मात्र पावसामुळे या विद्युत पंपाच्या स्टार्टरमध्ये पाणी गेल्याने त्यात विद्युत प्रवाह उतरलेला होता़ हिरामण यांनी स्टार्टरवरील बटन दाबताच त्याचा विजेचा धक्का लागून ते चिटकले़ मुलाला विजेचा धक्का लागल्याचे लक्षात येताच आई शांताबाई सहारे यांनी त्यांना खेचण्याचा प्रयत्न केला असता दोघांनाही जोरदार विजेचा शॉक बसला व ते बाजूला फेकले गेले.सहारे कुटुंबीयांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी या दोघांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकाºयांनी तपासून मयत घोषित केले़ या घटनेची हरसूल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़
पेठ तालुक्यातील मायलेकाचा शॉक लागून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 11:17 PM
नाशिक : शेतातील विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या मुलाला विजेचा धक्का लागल्याचे पाहून त्यास वाचविण्यासाठी गेलेल्या आईसह मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पेठ तालुक्यातील कुलवंडी येथे शनिवारी (दि़१९) रात्रीच्या सुमारास घडली़ हिरामण झिपर सहारे (४७) व शांताबाई झिपर सहारे (७०) अशी विजेच्या धक्क्याने मृत्यूमुखी पडलेल्या मायलेकाची नावे आहेत़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ...
ठळक मुद्देविद्युत पंप सुरू करण्यासाठी गेले होते़ जोरदार विजेचा शॉक बसला व बाजूला फेकले गेले.