नाशिक : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात शहर वाहतूक शाखेने शुक्रवारी (दि़१५) विशेष मोहीम राबविली़ यामध्ये ५९ रिक्षांची तपासणी करून १९ रिक्षाचालकांवर कारवाई, तर कागदपत्रे नसलेल्या ४० रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत़
शहर वाहतूक शाखेच्या वतीने शहरातील विविध परिसरात अचानक रिक्षातपासणी मोहीम राबवून कारवाई करण्यात आली. यामध्ये गणवेश परिधान न करणे, वाहनांची कागदपत्रे जवळ न बाळगणे, चालकाच्या आसनाशेजारी प्रवासी बसविणे, रिक्षाथांबा नसताना रिक्षा थांबविणे अशाप्रकारे नियमांची पायमल्ली करणारे बेशिस्त रिक्षाचालक आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली़पोलीस आयुक्तडॉ़ रवींद्रकुमार सिंगल, पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिलेल्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली असून, सहायक पोलीस आयुक्त अजय देवरे, डॉ़ राजू भुजबळयांच्यासह वाहतूक तसेच पोलीस ठाण्यांतील अधिकारी व कर्मचाºयांनी ही कारवाई केली आहे.
कारवाई सुरूच ठेवणारवाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाºया बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई सुरू राहणार आहे़ रिक्षाचालकांनी त्यांच्या रिक्षाची मूळ कागदपत्रे शहर वाहतूक विभागाच्या कार्यालयात तपासणी करून घेऊन नोंदणी करावी तसे त्यासंबंधीचे वाहतूक विभागातील स्टीकर घेऊन ते रिक्षाच्या दर्शनी भागात चिकटवावे़- लक्ष्मीकांत पाटील, पोलीस उपायुक्त, नाशिक