नाशिक : मुंबई नाक्याजवळील कसारा टॅक्सी स्टॅण्डजवळ जुगार खेळणाऱ्या पाच जुगा-यांना मुंबई नाका पोलिसांनी मंगळवारी (दि़ १९) सायंकाळी छापा टाकून अटक केली़ या जुगा-यांकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़
मुंबई नाका परिसरातील टॅक्सी स्टॅण्डजवळ असलेल्या चिंचेच्या झाडाखाली चार ते पाच संशयित जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ त्यानुसार सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास पोलिसांनी या ठिकाणच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून संशयित शंकर आत्माराम डोंगरे (२७, रा. ४, कोमल अपार्टमेंट, भाभानगर, नाशिक) व त्याच्या चार साथीदारांना ताब्यात घेतले. हे सर्व संशयित पत्त्यावर अंदर बाहर नावाचा जुगार खेळत होते़ त्यांच्याकडून ४९ हजार १४० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
या प्रकरणी पोलीस शिपाई राजेंद्र उगले यांच्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़